सावधान! ऑनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्यांची होतेय फसवणूक

प्रोफाईलचा दुरुपयोग करून अविवाहित किंवा घटस्फोटितांना ठकविण्याचे प्रकार वाढले आहेत.
सावधान! ऑनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्यांची होतेय फसवणूक
e sakal

बेळगाव : विवाह नोंदणी केंद्र, मेट्रोमोनियमल साईट्स आणि व्हॉट्स ग्रुपवर हल्ली विवाह नोंदणीसाठी तरुण किंवा तरुणींचे प्रोफाईल बघायला मिळतात. मात्र, या प्रोफाईलचा दुरुपयोग करून अविवाहित किंवा घटस्फोटितांना ठकविण्याचे प्रकार वाढले आहेत. काही घटनांमध्ये लैंगिक शोषणही घडले आहे. यामुळे विवाहासाठी ऑनलाईन सेवेचा आधार घेताना त्याची विश्वासार्हता तपासण्यासह काही बाबतीत गोपनियता बाळगण्याचीही गरज आहे.

लग्न जुळविण्याच्या पद्धतीत काळानुरुप अनेक बदल झाले आहेत. पारंपरिक पद्धतीला ऑनलाईनची जोड मिळत असून मध्यम, उच्चशिक्षित तरुण-तरुणी मेट्रोमोनियल साईट्सवर नोंदणी करु लागले आहेत. यामुळे लग्न जुळवण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था कार्यरत आहेत. सध्या ऑनलाईनची जोड मिळाल्यामुळे स्थानिकांसह जगाच्या कानाकोपऱ्यातील तरुण व तरुणींना संवाद वाढवणे शक्य झाले आहे. यातून आवडीचा जोडीदार शोधले जाऊ लागले आहेत.

सावधान! ऑनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्यांची होतेय फसवणूक
तात्पुरती मदत नको, जॉब शोधुया; अंध कालाकाराचे 'युट्यूब' वर आवाहन

काही साईट्स विनाशुल्क सेवा देत आहेत. तर काही साईट्स शुल्क आकारुन सेवा देत आहेत. माहिती, फोटो आणि तपशिल साईट्सवर नोंदणी केलेल्यांना पाहता यावी, हा यामागील उद्देश आहे. मोजक्या माहितीच्या आधारे साईट्सवर तपशील अपलोड केला जाऊ शकतो. जोडीदार पसंत पडल्यास साईट्सच्या माध्यमातून संवाद साधता येतो. त्यानंतर वैयक्तिक पातळीवर संवाद वाढविता येतो. परंतु, या स्वरुपाच्या साईट्सचे काही धोकेही आहेत.

या स्वरुपाच्या साईट्सवर काही अट्टल गुन्हेगार सक्रिय असले तरी त्याला साईट्स जबाबदार राहत नाही. मात्र, ऑनलाईन नोदणी करणारेही तितके कारणीभूत आहेत. साईट्सवर फेक अकौंट्स, खोटी माहिती टाकणारे असल्यामुळे साईट्सवर एखादा तरुण किंवा तरुणी आवडली तर शहानिशा करुन घ्यावी. नोकरी, पगार, घर किंवा इतर तपशिलची खातरजमाही करुन घ्यावी. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. त्यासाठी विवाह ठरविताना सर्व बारकावे तपासणे गरजेचे बनले आहे.

सावधान! ऑनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्यांची होतेय फसवणूक
कोरोना काळातील वादग्रस्त रुग्णालयाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

साईट्सबाबत काय काळजी घ्यावी?

  • सरसकट सगळी माहिती अपलोड करु नये.

  • वैयक्तिक तपशिल टाकू नये.

  • शक्यता जुजबी माहिती द्यावी.

  • चॅट किंवा संवाद पूर्ण व्यावहारिक असावेत. भावनिक संवाद टाळावेत.

  • लग्नापूर्वी पैशाची मागणी केल्यास सावध व्हावे.

  • एकांतात भेटण्यास बोलविल्यास टाळणे योग्य.

  • साईट्सवरील तपशिलची प्रत्यक्षात खातरजमा करुनच पुढील निर्णय घ्यावा.

  • गरज भासल्यास त्वरीत नजिकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com