पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी.. सोलापुरात होणार 34 वे पक्षी संमेलन

परशुराम कोकणे
शनिवार, 11 जानेवारी 2020

सोलापूर : पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. 34 वे महाराष्ट्र पक्षी संमेलन सोलापुरात होणार आहे. अलिबाग येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र पक्षी संमेलनात शनिवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. 

सोलापूर : पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. 34 वे महाराष्ट्र पक्षी संमेलन सोलापुरात होणार आहे. अलिबाग येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र पक्षी संमेलनात शनिवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. 

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!
महाराष्ट्र
डॉ. व्यंकटेश मेतन यांनी मांडला प्रस्ताव
वाईल्डलाईफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन, पर्यावरण अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर अलिबाग येथील पक्षी संमेलनात सहभागी झाले आहेत. माळरानावरील वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या सोलापुरात पक्षी संमेलन व्हावे, असा प्रस्ताव डॉ. मेतन यांनी संमेलनात मांडला. त्यास सकारात्मकता दर्शवून अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.

हेही वाचा -  सुरक्षा रक्षकाने मुलीला दाखवले खाऊचे आमिष! अन्‌..

संमेलनाच्या अनुषंगाने लवकरच बैठक
सोलापुरात पक्षी संमेलन व्हावे यासाठी डॉ. मेतन यांच्यासह अन्य मान्यवर अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. सर्वांच्या प्रयत्नाला यश आल्याची भावना पक्षी मित्रांमधून व्यक्‍त होत आहे. 34 वे महाराष्ट्र पक्षी संमेलनाचे आयोजकत्व सोलापूरकडे येणार असून यासाठी आपण सर्वजण तयारी करूया, असे डॉ. मेतन यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. संमेलनाच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

जिल्ह्यातील पक्षीवैभव
सोलापूर जिल्हा पक्षी वैभवाने नटलेला आहे. जिल्ह्यात नद्या, ओढे तसेच तलावं मुबलक आहेत. जिल्ह्यात सुमारे शंभर किलोमीटर पेक्षा अधिक लांब वाहणाऱ्या, भीमा, सीना, माण, बोरी इत्यादी नद्यांचे काठ स्थलांतरित पक्ष्यांना हिवाळ्यात पोषक वातावरण निर्माण करून देतात. लहान-मोठे ओढे-नालेही जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीत महत्वाची भूमिका बजावतात. जिल्ह्यातील एकूण बारा मध्यम प्रकल्प व एक्कावन्न लघु प्रकल्पातील पाणस्थळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन ठरले आहेत. शिवाय जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बऱ्याच गावतळी सुद्धा या पक्ष्यांना वरदायी ठरली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakshi Sanmelan in solapur