आता साताऱ्यासाठी सचिन तेंडूलकर घेणार पुढाकार ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कुटुंबाची समर्थ रामदास स्वामींवर श्रद्धा आहे. त्याचे बंधू अजित तेंडुलकर हे समर्थ रामदास स्वामी यांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर आले होते. तेंडूलकर यांनी कास, सज्जनगड, ज्ञानश्री इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण गोडबोले यांच्या " आनंदी निवास" या निवासस्थानी भेट दिली.

सातारा : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सज्जनगडवरील राेप वे साठी पाठपूरावा अशी मागणी समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख संघटक अरुण गाेडबाेले यांनी सचिनचे बंधू अजित तेंडुलकर यांच्याकडे केली. तेंडूलकर हे  समर्थ रामदास स्वामी यांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर आले होते.

तेंडूलकर यांनी कास, सज्जनगड, ज्ञानश्री इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीसह ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण गोडबोले यांच्या " आनंदी निवास" या निवासस्थानी भेट दिली. तेंडूलकर यांनी काहींच्या गाठी भेटीही घेतल्या. पत्रकार हरिष पाटणे यांच्याकडून त्यांनी साताऱ्यातील पर्यटनाची, ज्ञानश्रीचे संघटक चंद्रकांत वांगडे यांच्याकडून शैक्षणिक, समर्थ सेवा मंडळाचे अरुण गाेडबाेले यांच्याकडून सामाजिक आणि धार्मिक गाेष्टींची माहिती घेतली. 

अरुण गाेडबाेलेंनी तेंडूलकर यांना "मनाचे श्लोक : एक मागोवा" हे पुस्तक भेट दिले. सज्जनगड रोप वे चा त्यांनी व सचिन यांनीही पाठपुरावा करावा अशी विनंती देखील केली. त्यावेळी उभ्यत्यांमध्ये काही गप्पा झाल्या. त्यावेळी तेंडूलकर कुटुंबांचा साताराशी विशेष स्नेह राहिल्याची भावना अजित यांनी व्यक्त केली. ते म्हणाले आमच्या माताेश्री या समर्थ रामदास स्वामी यांच्या निस्सीम भक्त आहेत. सातारा शहरात मी प्रथमच आलाे. येथील निसर्ग आणि वातावरण अफलातून आहे. 

हेही वाचा : भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम

ज्ञानश्री महाविद्यालयातील भेटीतही तेंडूलकर भारावून गेले हाेते. संपुर्ण महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी भाई वांगडे आणि त्यांच्या सर्व सहाकारी आणि परिवाराचे काैतुक केले. केवळ काैतुक करुन न थांबता तेंडूलकर यांनी छाेट्याशा अभिप्रायातून संस्थेस शुभेच्छाही व्यक्त केल्या. तेंडूलकर लिहितात श्री. भाई वांगडे यांच्या पुढाकाराने नावारुपाला आलेली ही शिक्षणसंस्था जिल्हा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच आहे. एक सुरेख टीमवर्कचा हा एक अनुभव आहे. संस्थेच्या पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

नक्की वाचा : साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

हेही वाचा : काळजाला भिडतेय स्मशानातील माया

जरुर वाचा : इकडे मनसे जाेमात तिकडे राष्ट्रवादी काेमात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar Brother Ajit Visits Satara