Kolhapur : महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. जनार्दन दाभोळे यांचं निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डॉ. दाभोळे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. पाच वर्षांनी कुटुंबीयासह ते कराडमध्ये स्थायिक झाले.
Prof. Janardhan Ramchandra Dabhole Passed Away
Prof. Janardhan Ramchandra Dabhole Passed Awayesakal
Summary

महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णा आदी महापुरुषांचे विचार डॉ. दाभोळे यांनी पुढे नेले.

कोल्हापूर : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. ज. रा. ऊर्फ जनार्दन रामचंद्र दाभोळे (वय ८४) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत (Panchganga Crematorium) अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी रेखा, मुली सुचित्रा, रूपाली, जावई असा परिवार आहे.

Prof. Janardhan Ramchandra Dabhole Passed Away
Raja Shirguppe : ज्‍येष्‍ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं कोल्हापुरात निधन; वयाच्या 64 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास

येथील नागाळा पार्कमधील रत्नोदय हौसिंग सोसायटीमध्ये डॉ. दाभोळे (Janardhan Ramachandra Dabhole) राहत होते. त्यांना कफचा त्रास होता. तो वाढला आणि बुधवारी रात्री निवासस्थानी प्राणज्योत मालवली. डॉ. दाभोळे यांचा जन्म तारळे (जि. सातारा) येथे १ मे १९४० रोजी झाला. ते लहान असतानाच व्यवसायानिमित्त त्यांचे कुटुंब पुण्याला गेले.

डॉ. दाभोळे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. पाच वर्षांनी कुटुंबीयासह ते कराडमध्ये स्थायिक झाले. तेथील सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात त्यांचे तत्त्वज्ञान विषयातील उच्च शिक्षण झाले. कर्मवीर भाऊराव पाटील, बॅरिस्टर पी. जी. पाटील, डॉ. जे. पी. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

Prof. Janardhan Ramchandra Dabhole Passed Away
Virdhawal Khade : 'माझी भारतातील ही शेवटची स्पर्धा..'; ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवलने जाहीर केली निवृत्ती

१९६६ ला त्यांनी सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली. पुढे कोरेगाव, साताऱ्यात अध्यापन केले. त्यानंतर कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात रुजू झाले. येथून तत्त्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून ३० एप्रिल २००० मध्ये निवृत्त झाले. त्यांनी ३० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले होते.

महापुरुषांचा विचार पुढे नेला

महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णा आदी महापुरुषांचे विचार डॉ. दाभोळे यांनी पुढे नेले. त्यांनी कोल्हापुरात विधानसभेची निवडणूकही लढविली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com