Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

Raju Shetti statement on Shaktipeeth highway : शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या नकाशाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे अनेक तालुक्यांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
Shaktipeeth Highway On Raju Shetti

Shaktipeeth Highway On Raju Shetti

esakal

Updated on

Raju Shetti opposes Shaktipeeth highway : ‘शक्तिपीठविरोधात आंदोलन उभारून सांगली परिसरातून हा महामार्ग पिटाळण्यात यशस्वी झालो आहोत. नवीन आखणीतूनही हा महामार्ग होऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संघटनेचे संदीप राजोबा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, ‘पूर्वीचा शक्तिपीठ १२ जिल्ह्यांतून होता. त्यात आता साताऱ्यांची भर पडली. हा महामार्गच अव्यवहार्य असून, या प्रकल्पातून तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे शिराळा तालुक्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com