लयभारी ! रिक्षा चालकांचा असाही प्रामाणिकपणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणा ,जवानांची बॅग केली परत ; वाहतूक नियंत्रण शाखेकडून सत्कार .सीमा सुरक्षा दलाचा जवान आज घाईघाई रिक्षात बसला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चंदगडच्या बसमध्ये जाण्याच्या घाईत त्यांची बॅगच रिक्षात विसरली. ही बाब चालकाच्या लक्षात आली. त्यांनी ही बॅग प्रामाणिकपणे येथील वाहतूक कक्षातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वाधिन केली. 

कोल्हापूर  :  सीमा सुरक्षा दलाचा जवान आज घाईघाई रिक्षात बसला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चंदगडच्या बसमध्ये जाण्याच्या घाईत त्यांची बॅगच रिक्षात विसरली. ही बाब चालकाच्या लक्षात आली. त्यांनी ही बॅग प्रामाणिकपणे येथील वाहतूक कक्षातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वाधिन केली. काही वेळात संबधित जवान तेथे बॅग शोधत आले. त्यांना पोलिसांनी ती परत केली. त्याचबरोबर संबधित रिक्षा चालक प्रकाश प्रशांत जाधव यांचा पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी सत्कार केला. 

हेही वाचा - जगातले सर्वांत उंचीवरचे पोस्ट ऑफिस आहे कोठे ? कोल्हापूरकर पोहोचले तिथे 

सीमा सुरक्षा दलातील जवान सुनील रवळू पाटील हे मूळचे चंदगडचे आहेत. ते सध्या गडचिरोलीत कर्तव्य बजावतात. सुट्टीसाठी ते गावी जाण्यासाठी कोल्हापुरात आले होते. प्रकाश जाधव यांच्या रिक्षात ते सकाळी बसले. ते मध्यवर्ती बसस्थानकाजवळ रिक्षातून उतरले. थेट तसे ते घाईत बसथांब्यात गेले. या गडबडीत त्यांची महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरली. जाधव यांना येथील थांब्यावर रिक्षा उभी करत असताना रिक्षात बॅग दिसून आली. ती त्यांनी ही बॅग वाहतूक नियंत्रण कक्षात दिली.

हेही वाचा - दाजीपूर अभयारण्य या तारखेपासून खुले

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार

दरम्यान जवान पाटील हे बॅग शोधत तेथे आले. येथील वाहतूक पोलिसांनी त्यांना बॅग कक्षेत रिक्षा चालक जाधव यांनी आणून दिल्याचे सांगितले. वाहतूक पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या हस्ते जवान सुनील पाटील यांना रिक्षा चालक प्रकाश जाधव यांच्या हस्ते बॅग परत करण्यात आली. रिक्षा चालक जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचारी एस. पी. निळपणकर, ए. आर. पाटील, एस. के. भोसले आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - ‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw Drivers Sincerity Return Passenger Bag