esakal | ‘रोस्टर’ रद्द; शिक्षक भरती कधी?
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक

‘रोस्टर’ रद्द; शिक्षक भरती कधी?

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक शाळांच्या मानगुटीवर बसलेली रोस्टर पद्धत रद्द करण्यात आली आहे. मात्र, अजूनही शिक्षक भरतीला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून कायमस्वरुपी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांचे डोळे भरती प्रक्रियेकडे लागून राहिले आहेत.

हेही वाचा: चित्रकार मस्केने साकारले पडीक जमिनीवर 15 बाय 30 फुटांचे गणराय !

भाषिक अल्पसंख्याक शाळांना रोस्टर पद्धत लागू करण्यात आल्याने गेल्या काही वर्षांपासून भाषिक अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने रोस्टर पद्धत रद्द केली. मात्र, अजूनही शिक्षक भरतीवरील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अद्यापही विनाअनुदानित शिक्षकांना भरतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. गेल्या १३ ते १४ वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने अनेक शिक्षकांची वयोमर्यादा संपत आली आहे. यासाठी लवकर शिक्षक भरती व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे. शिक्षक भरती वेळेत न झाल्यास अनेक वर्षे विनावेतन काम करुनही अनेकांना कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे.

हेही वाचा: 80 वर्षांच्या आजोबाला नातवानेच घातला साडेतेरा लाखांचा गंडा!

शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. मात्र, अनेक वर्षे शिक्षक भरती न झाल्यामुळे काही शिक्षकांची वयोमर्यादा पूर्ण होत आली आहे. त्याकरिता शिक्षक भरती लवकर होणे गरजेचे आहे. तसेच वयोमर्यादा पूर्ण होत आलेल्या शिक्षकांना वयोमर्यादेत वाढ करून देण्याची गरज असल्याचे मत शिक्षकांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक 'सोन्या मारुती गणपती'!

"काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री बेळगावला आले होते. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून लवकर शिक्षक भरतीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. गेल्या १३ ते १४ वर्षांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना वयोमर्यादा वाढवून घेण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे."

- उमेश कुलकर्णी, सचिव, बेळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना

loading image
go to top