बाबा बुलाते हैं, हम आते हैं 

सतीश वैजापूरकर
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शिर्डी ः ""पुन्हा चित्रपटसृष्टीत यायचे नाही, असे ठरवूनच बावीस वर्षांपूर्वी स्टुडिओतून बाहेर पाऊल टाकले. मला कोणी भूमिका दिली म्हणून मी स्वीकारीन, असा प्रश्‍नच निर्माण होत नाही. माझी मुलगी आणि मुलगा या क्षेत्रात कार्यरत आहेत. पडद्यामागे राहून त्यांना मार्गदर्शन करतो. फार पूर्वीपासून मी येथे येतो. साईसमाधीचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्‍वराला स्पर्श केल्याचा आनंद मिळतो. बाबा बुलाते हैं, इसलिए हम आते हैं,'' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी आज भावना व्यक्त केल्या. 

हेही वाचा सहलीसाठी "एसटी बस' मिळेल हो... 

जितेंद्र यांनी आज दुपारी येथे येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. साईसंस्थानाचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जितेंद्र पत्रकारांशी बोलत होते. स्टुडिओतून बाहेर पडलो त्याच वेळी, पुन्हा चित्रपटात काम करायचे नाही, असा निश्‍चय केला होता, असे सांगून ते म्हणाले, ""मैं आता नहीं, साईबाबा बुलाते हैं. साईदर्शन के बाद शांती और तृप्ती का आनंद मिलता हैं. फिर जब आऊंगा, तब परिवार को साथ लाऊंगा. फिल्म इंडस्ट्री में जो करना था, वो कर लिया. अब बच्चों का साथ दे रहा हूँ.'' 

हेही वाचा नामी शक्कल! वाळूची आलिशान वाहतूक! 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Baba calls and I come: Jitendra