esakal | Vidhan Sabha 2019 : मोदींच्या साताऱ्यातील सभेला भिडे आले अन्‌ गेले ही...
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Bhide came to Modi Satara Sabha but he did not listening modi speech

पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यातील सभेकरिता व्यासपीठावर आल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदूस्तान संघटनेचे संभाजी भिडे व्हीआयपी कक्षात आले. त्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. मात्र, उदयनराजेंचे भाषण संपल्यावर नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असतानाच ते बाहेर पडले. त्यामुळे ते सभा संपण्यापूर्वीच का निघून गेले याची चर्चा सभास्थळी सुरू झाली होती.

Vidhan Sabha 2019 : मोदींच्या साताऱ्यातील सभेला भिडे आले अन्‌ गेले ही...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यातील सभेकरिता व्यासपीठावर आल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदूस्तान संघटनेचे संभाजी भिडे व्हीआयपी कक्षात आले. त्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. मात्र, उदयनराजेंचे भाषण संपल्यावर नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असतानाच ते बाहेर पडले. त्यामुळे ते सभा संपण्यापूर्वीच का निघून गेले याची चर्चा सभास्थळी सुरू झाली होती.

मराठा आरक्षणावरून उदयनराजेंची पवारांवर टीका, म्हणाले...

दरम्यान, साताऱ्याच्या सभेत छत्रपतींच्या स्वप्नातील भारत घडवू असा निर्धार मोदींनी बोलून दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आधीच आहेत. आता त्यांचा संपूर्ण परिवारही आमच्याबरोबर आहे. छत्रपतींचे संस्कार व परिवार या दोन्हींच्या संगमातून छत्रपतींच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्थान बनविण्यासाठी नवी ताकद व ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

विरोधकांकडे साताऱ्यात उमेदवारच नव्हता; पंतप्रधान मोदींचा राष्ट्रवादीला टोला

तसेच, देश-विदेशांतील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या सर्वोत्कृष्ट 15 ठिकाणांमध्ये साताऱ्याचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगतानाच, त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला केला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले, विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.