झरेकर आक्रमक झाले 'या' कारणासाठी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

आरपीआयचे धनंजय वाघमारे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे आज..... 

झरे (सांगली) : झरे येथील अतिक्रमण हटाव विरोधात व रोडरमियोच्या विरोधी आरपीआयचे धनंजय वाघमारे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे आज रोजी सकाळी नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत पासून चौकापर्यंत मोर्चाने लोकांनी मल्हारपेठ, पंढरपूर महामार्गावर येऊन सकाळी साडे नऊच्या दरम्यान रस्ता रोको आंदोलन सुरू केले. महामार्गावर ती आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले.

 आंदोलन सुरू होताच शिवसेनेचे नेते साहेबराव चौरे, रमेश कातुरे , माजी समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर, सरपंच सिंधू माने, उपसरपंच हनमंत पाटील, आरपीआयचे सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या या उपस्थित होत्या तसेच माजी उपसरपंच आप्पा भानुसे व माजी उपसभापती नारायण चौरे आरपीआयचे राजेंद्र खरात व सामाजिक कार्यकर्ते ते अधिक माने, उपस्थित होते. तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

हेही वाचा- त्याला आला हा संशय आणि त्याने केला ; दानोळीत एकाचा निर्घृण खूण....

पुन्हा पंधरा दिवसांनी आंदोलन

तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या समजावून घेऊन लगेच सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर, आटपाडी, गट विकास अधिकारी शमधुकर देशमुख पोलीस निरीक्षक श्री कांबळे आरपीआयचे धनंजय वाघमारे , सरपंच सिंधू माने, ग्रामसेवक डी के गळवे व ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक तहसीलदार कार्यालयामध्ये दुपारी बोलवण्यात आली आहे. त्यामध्ये तोडगा काढू असे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलकांना शब्द दिला व त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
 तहसीलदार कार्यालयांमध्ये होणाऱ्या मीटिंगमध्ये जर तोडगा निघाला नाही , तर पुन्हा पंधरा दिवसांनी आंदोलन करणार असे आरपीआयचे धनंजय वाघमारे यांनी सांगितले. 

 हेही वाचा- अन् मायालेकींची भेट ठरली अखरेची....

रोडरोमिओंचा बंदोबस्त गरजेचा

आंदोलनातील मुख्य दोनच मागण्या आहेत रस्त्यालगत असणारी अतिक्रमण हटवा व रोडरोमिओंचा बंदोबस्त करा या दोनच मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं होतं.
 यापूर्वी धनंजय वाघमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर व आटपाडी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता त्यामध्ये एका पत्रव्यवहारामध्ये आमची जबाबदारी नाही असं म्हटलं जातं तर दुसऱ्या पत्रांमध्ये अतिक्रमण आमच्या अतिरिक्त खाली येत आहे ते ग्रामपंचायत च्या जबाबदारीत आहे असं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- कशाने भारावले परदेशी पाहुणे कोल्हापुरात....

राजकीय सामाजिक संघटनांचा पाठिंबा

तर येथीलच एका घराचे बांधकाम सुरू असताना त्यांना पत्र दिले जात आहे की तुमचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये येत आहे तरी ते त्वरित थांबवावे म्हणजे सार्वजनिक बांधकामच्या दुटप्पी धोरणामुळे हे आंदोलन झालं आहे. आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. रस्त्यालगत अतिक्रमण झालेल्या दोन शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे मुलींची छेडछाड होते.  त्यासाठी रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा अशा या आंदोलनातील प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनाला सर्व राजकीय सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता.

विद्यार्थिनींचा त्रास थांबला पाहिजे
 महामार्गावरील अतिक्रमण हाटले पाहिजे, व रोडरमीओ चा बंदोबस्त करून शालेय विद्यार्थिनीचा त्रास थांबवावा .यावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन करणार 
- धनंजय वाघमारे - नेते आर पी आय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangali Agitation On Road In zare Sangli Marathi News