मणेराजुरी पाठोपाठ कुपवाड हादरलं; प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

कुपवाडला प्रेमी युगलांची आत्महत्या,शेतातील मळ्यात विष घेऊन गळफास
lovers suicide
lovers suicidesakal

कुपवाड : मणेराजुरी (ता. तासगाव) (Manerajuri) परिसरातील शिकोबा डोंगरावर एक युवक आणि दोन युवतींनी द्राक्ष पिकाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा कुपवाड (Khupwad)बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या खोत मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये विष प्राशन करून प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू महादेव माळी ( वय 36 रा.खोत मळा, बुधगाव रोड (कुपवाड) व रीना किरण पार्लेकर कर्मचारी (33 वखारभाग रामलिंग कॉलनी,मिरज) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोघे प्रेमीयुगल हे कुपवाड औद्योगिक वसाहती मधील एका गारमेंटमध्ये नोकरीस आहेत. कुपवाड - बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या एका मळ्यामधील पत्र्याच्या शेडमध्ये दोघेजण शुक्रवारी रात्री एकत्र आले. विष प्राशन करून दोघांनी शेडमधील लोखंडी अँगलला एका साडीने गळफास घेतला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शेडचे दार बंद होते. दार तोडून उघडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

lovers suicide
शिवरायांच्या विटंबनेनंतर गुलाबराव पाटील आक्रमक; कर्नाटकला इशारा

मणेराजुरीतील डोंगरावर दोन युवतींसह युवकाची आत्महत्या

तीन दिवसापूर्वी घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून प्रेम प्रकरणातून ह्या आत्महत्या घडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी वर्तवले. गुरुवारी पहाटे या आत्महत्या झालेल्या असाव्यात. यापैकी मृत हरिष हा कोणताही कामधंदा करत नव्हता. हरिष आणि प्रणाली हे नातेवाईक आहेत. शिवानी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. घाडगे ही मणेराजुरी येथे आपल्या नातेवाईकाकडे अधूनमधून येत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com