काेराेना राक्षसाला नमवून ते शंभरजण परतले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 181 झाली आहे. यापैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 71 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 106 आहे तर मृत्यु झालेले चार रुग्ण आहेत.

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असणारे आठ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना आज (गुरुवार) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये तरडगाव ता. फलटण येथील 67 वर्षीय महिला व सहा वर्षाचा मुलगा, फलटण येथील 33 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 13 वर्षांची मुलगी, कोडोली (ता. सातारा) येथील 18 वर्षाचा युवक, महाबळेश्वर येथील 23 वर्षीय पुरुष, त्रिपूटी (ता. कोरेगाव) येथील 36 वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा 18 वर्षीय युवक असे एकूण आठ जणं काेरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 106 नागरिक कोराेना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 11, ग्रामीण रुग्णालय, वाईतील सात व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12 असे एकूण 119 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचा असे एकूण 129 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  आमोद गडीकर यांनी कळविले आहे. दरम्यान बुधवारी (ता.20) रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57 असे एकूण 70 जणांना केले विलीगकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 19 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

याबराेबरच बुधवारी (ता.20) रात्री प्राप्त अहवालानुसार क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील चार (चिंचनेर निंब ता.सातारा) येथील मुंबई वरून आलेला 30 वर्षीय युवक, गादेवाडी (ता. खटाव) येथील 30 व 32 वर्षीय पुरुष तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाच्या निकट सहवासातील नऊ वर्षाची मुलगी) , वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील तीन ( म्हासोली ता. कराड) येथील 22 वर्षीय युवती व 28 वर्षीय पुरुष तसेच मेरुएवाडी येथील 33 वर्षीय पुरुष), उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील दाेन (कोळकी येथील 74 वर्षीय पुरुष व फरडवाडी, ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष), ग्रामीण रुग्णालय, वाई येथे कवठे (ता. खंडाळा) येथील 33 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल म्हासोली (ता. कराड) येथील  50 वर्षीय निकट सहवासित अशा एकूण 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी फलटण येथील 74 वर्षीय पुरुषाचा ता. 18 रोजी मुंबई वरून प्रवास करून आल्यानंतर मृत्यू झाला होता. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

सातारा : दुकानांसह वाहतूक उद्यापासून खुली; काळजी घेण्याची सूचना

उद्यापासून साताऱ्याहून चार विशेष रेल्वे गाड्या सुटणार

पाहुण्याच्या मृत्यूचा अहवाल आला पॉझिटिव्ह अन् चुकला कोळकीकरांचा काळजाचा ठोका       

सातारा : एसटीची चाके फिरणार; 31 बसच्या 101 फेऱ्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Covid 19 Infected Paitent Recoverd