उद्यापासून साताऱ्याहून चार विशेष रेल्वे गाड्या सुटणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

ज्यांना उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड राज्यात जायचे आहे त्यांच्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी साताऱ्यावरुन चार रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ज्यांना तिकडे जायचे आहे त्यांनी संबंधित गावच्या तलाठ्यांकडे तात्काळ नावाची नोंदणी करावी असे आवाहन कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.

कऱ्हाड : कामासाठी जिल्ह्यात आलेले उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड येथील अनेक मजुर अजुनही जिल्ह्यातच अडकुन पडले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना घरी जात आलेले नाही. भाषेच्या अडचणीमुळे त्यांना आॅनलाईन अर्जही भरता येत नाहीत. त्याचबरोबर अनेक मजुरांकडे आधार कार्डही नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा असुनही त्यांना त्यांच्या राज्यात जाता येत नव्हते. त्यांच्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने रेल्वेच्या सहकार्याने पुढाकार घेतला असुन शुक्रवार (ता. २२) आणि शनिवारी (ता.२३) साताऱ्यावरुन चार विशेष रेल्वे गाड्या त्यांच्यासाठी सोडण्यात येणार आहेत.

मिळेल ते काम करुन पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातील मजुर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून येथील उद्योग-व्यवसायाला चांगला हातभारही लागतो. मात्र कोरोनाच्या महामारीच्या संकटाने डोकं वर काढल्याने २२ मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व बंद करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला. त्यामुळे सारेच व्यवसाय, उद्योगधंदे, मजुरीचा कामे, बांधकामे बंद झाली. परिणामी हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर कुऱ्हाडच आली. त्यातच कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाबंदीचे आदेश काढले. त्यामुळे या मजुरांचे घरी जाण्यासाठी दोर कापले गेले. त्यामुळे त्यांना हताशपणे कामाच्या ठिकाणीच बसून राहण्याशिवाय पर्यायच उरला नाही.

त्यादरम्यान केंद्र व राज्य शासनाकडे, लोकप्रतिनिधींकडे संबंधित मजुरांनात त्यांच्या मुलखात पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी झाली. त्याचा विचार करुन शासनाने रेल्वे, एसटी, खासगी वाहनांतून त्यांची त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरु केली. मात्र त्यासाठी संबंधित मजुरांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे अट्ट घालण्यात आली आहे. संबंधित मजूर परराज्यातील असल्यामुळे एकतर भाषेची अडचण, ते साक्षर नसल्याने फॉर्मही भरण्याची अडचण निर्माण झाली होती. त्याचबरोबर आधार कार्डही अनेकांकडे नसल्याने त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पास मिळत नव्हता. त्यासंदर्भात दैनिक सकाळने आवाज उठवला होता. जिल्हा प्रशासनाने संबंधित मजुरांच्या अडचणीची दखल घेतली आहे. ज्यांना उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार राज्यात जायचे आहे त्यांनी गावातील तलाठी यांच्याकडे तातडीने नावनोंदणी करायची आहे. त्यांच्यासाठी शुक्रवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता उत्तर प्रदेशसाठी आणि रात्री आठ वाजता बिहारसाठी तर शनिवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता झारखंडसाठी आणि रात्री आठ वाजता बिहारसाठी रेल्वे सोडण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड राज्यात जायचे आहे त्यांच्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी साताऱ्यावरुन चार रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ज्यांना तिकडे जायचे आहे त्यांनी संबंधित गावच्या तलाठ्यांकडे तात्काळ नावाची नोंदणी करावी.
 
अमरदीप वाकडे,  तहसीलदार, कऱ्हाड 

सातारकरांनाे, दाेन दिवस पाणी येणार नाही

सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...

आप्पासाहेब पाटील सृजनशील व्यक्तिमत्त्व

ऐकशील थोडं माझं..??

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Railyway Available For Uttar Paradesh And Bihar