जवान अमित पोळ यांना भावपुर्ण निरोप

जवान अमित पोळ यांना भावपुर्ण निरोप

खटाव (जि.सातारा) ः जवान अमित पोळ यांच्यावर येथे बुधवारी (ता.27) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व शासकीय अधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेत जवान पोळ यांना भावपूर्ण निरोप दिला.

सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
 
जवान अमित पोळ भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये त्यांचे अकस्मात निधन झाले. भारतीय सीमा सुरक्षा दलाचे एक अधिकारी व 11 जवान त्यांचे पार्थिव घेऊन खटावमध्ये दाखल झाले. बुधवारी (ता.27) सकाळी घरी पत्नी नीता, बहिणी दीपा, रूपाली व भाऊ अभिजित, नातेवाईक व विविध दलातील माजी सैनिकांनी अंत्यदर्शन घेतले. शास्त्रीनगरमधून एसटी स्टॅंडमार्गे अंत्ययात्रा काढण्यात आली. सीमा सुरक्षा दलाने सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान अमित अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी जवान पोळ यांचे अकाली निधन झाले. ही समस्त खटावकरांना आघात करणारी घटना आहे, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली. पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाच्या सावटामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत सरपंच नंदकुमार वायदंडे, अमर देशमुख, राहुल पाटील आदींनी अंत्यदर्शन घेतले.

पुण्यातील सहायक पोलिस आयुक्तावर भुईंजला खंडणीचा गुन्हा दाखल

बाप मेला होता...अन्‌ प्रशासनातील माणुसकीही!

कॉंग्रेस नेत्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप विषयी सेनेचे मंत्री म्हणाले....

...त्यानंतर विकता येणार नाही मद्य


पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाडळीतील शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले चीज 




 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com