Video : आजचा दिवस त्यांच्यासाठी जणू दिवाळीच

Video : आजचा दिवस त्यांच्यासाठी जणू दिवाळीच

सातारा ः लॉकडाऊनच्या काळात बंद झालेली सातारा जिल्ह्यातील दारुची दुकाने आज (बुधवार) तब्बल 50 दिवसानंतर उघडली. काही गावांमध्ये सकाळी सहापासून दारु खरेदी करता यावी यासाठी ग्राहकांनी दुकानांच्या बाहेर बैठक मारली होती. सर्वच दुकानांच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मद्द विक्रीला परवानगी देताना ज्या अटी घातल्या होत्या. त्या अटींचे पालन करताना दारु विक्रेते आणि ग्राहक दिसून आले. शहरानजीकच्या वाढे फाटा येथे तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंतची रांग लागली होती. ग्राहकांना एकेक करुन मर्यादित (नियमाप्रमाणे) दारु दिली जात होती. दरम्यान लोणंद कंन्टेमेंन्ट झोनमध्ये येत असल्याने येथील दारुचे एकही दुकान सुरू झालेले नाही.
 
वाई येथे लॉकडाऊनमुळे 50 दिवसानंतर सुरू झालेल्या विदेशी मद्य विक्रीच्या दुकाना बाहेर आज (बुधवार) सकाळपासूनच तळीरामानी सुमारे पाचशे मीटरच्या रांगा लावल्या होत्या. या शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर लावण्याचे व सोशल डिस्टनसिग नियम पाळले जात होते. काही ठिकाणी रांगा लावण्यासाठी कळक लावण्यात आले आहेत. भाजी मंडईतील, किसनवीर चौकातील, ब्राम्हणशाहीतील आणि सोनगीरवाडीतील विदेशी मद्याच्या दुकानाबाहेर लांब लचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती. देशी दारूच्या दुकानाबाहेर मात्र तुरळक गर्दी हाती. प्रत्येक ग्राहकाला नियमानुसार दोन लिटर, दोन फुल साईज व आठ क्वार्टरच्या बाटल्या नियमित दराने दिल्या जात होत्या. 

दहिवडी येथे दोन मद्य विक्रीची दुकाने आहेत. मद्य विक्रीस परवानगी मिळाल्यानंतर आज (बुधवारी) सकाळपासूनच दहिवडी परिसरातील तळीरामांनी मद्य खरेदीसाठी या दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. दोन्ही दुकानांसमोर मंगळवारी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी चौकोन आखले होते. आज (बुधवार) त्या चौकोनातच ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत. उन्हातान्हाची पर्वा न करता तळीराम मद्य खरेदीसाठी अतिशय शिस्तबध्दपणे रांगेत उभे होते. एका व्यक्तीस जास्तीत जास्त आठ बाटल्या मद्य देण्यात येत आहे. मास्क लावला असेल तरच मद्य देण्यात होते तसेच खरेदी करण्यासाठी काऊंटरसमोर आल्यावर ग्राहकाच्या सॅनिटायझरचा स्प्रे मारला जात आहे. यासोबतच पोलीस प्रशासनाने पोलीस व सोबत पोलीस मित्रांची या ठिकाणी नेमणूक केली आहे. तसेच उत्पादन शुल्क विभागाचे तीन कर्मचारीही लक्ष ठेवून आहेत. दुकानमालकांनी संभाव्य गर्दी लक्षात घेवून जास्त कर्मचारी नेमले आहेत. एकूण गर्दी लक्षात घेता आज दिवसभरात दहिवडीत मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होणार हे निश्‍चित.

 दारू दुकाने सुरु करण्यापुर्वी हे करा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आजपासून (बुधवार) मद्द विक्रीला परवानगी दिल्याने  कराड शहरातील वाईन शॉप खुली झाली. सकाळपासून मद्य खरेदीला नागरीकांची गर्दी होती. काही ठिकाणी तब्बल अर्धा ते एक किलोमीटरपर्यंतची रांग लागली होती. प्रत्येक दुाकानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. नागरीकांनी सोशल डिस्टन्सचा नियम पाळून दारूची खरेदी केली.

दरम्यान लोणंद कंन्टेमेंन्ट झोनमध्ये येत असल्याने आज (बुधवार) येथील दारुचे एकही दुकान सुरू झालेले नाही. रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट आहे. सातारा जिल्ह्यात मद्य मिळू लागल्याने ते घेऊन दुकानातून बाहेर पडताच ग्राहकांच्या चेहरे खूलत हाेते.

अभिमानास्पद : देशातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांत कृष्णाची निवड; कोरोनावरील लस सामन्यांना उपलब्ध हाेणार

...म्हणून अभियंत्यांनी आपले जीवन संपवले

आता तरी थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करा : पृथ्वीराज चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com