दारू दुकाने सुरु करण्यापुर्वी 'हे' करा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

दारू दुकाने सुरु करण्यापुर्वी 'हे' करा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

ढेबेवाडी (जि.सातारा) : सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात चोरट्या मार्गाने येणारी दारू रोखण्यासाठी भरारी पथके अधिक सक्रिय करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क व पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती गृह व उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी "सकाळ'ला दिली.

श्री. देसाई म्हणाले, ""दारूविक्रीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो ही वस्थुस्थिती असली, तरी जनतेचे हित व आरोग्याला प्राधान्य देत काही दिवस दारूविक्री पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. अलीकडे राज्यातील परवाना प्राप्त दारू विक्रीची दुकाने सुरू करायला विविध जिल्ह्यांत परवानगी देण्यात आलेली असली, तरी सातारा जिल्ह्यात मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप त्याला हिरवा कंदील दिलेला नाही. बंद काळात आणि इतरवेळीही चोरट्या व बेकायदा मार्गाने दारू वाहतूक व विक्री करणे गुन्हा असून, असे करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. मद्यपींसह अनेक चोरट्या विक्रेत्यांनी नजीकच्याच सांगली जिल्ह्याकडे मोर्चा वळविल्याचे समजले आहे. त्यासाठी नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्याचा वापर न करता डोंगरमार्गे सांगली जिल्ह्यात गेलेल्या वाटा निवडण्यात आलेल्या आहेत. ढेबेवाडी- काळगाव विभागातून शिराळा तालुक्‍यात गेलेल्या रस्त्यावरून सध्या चोरटी दारू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ढेबेवाडीच्या पोलिसांनी केलेल्या करवाईतून स्पष्ट झाले आहे. लॉकडाउन काळात बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतानाही तेथील पोलिसांनी राबविलेली मोहीम कौतुकास्पद आहे. मात्र, अशा मार्गांनी जिल्ह्यात अजिबात दारू येऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या आणि भरारी पथके अधिक सक्रिय करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.''
 
उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळ कमी असून, सुविधांचीही कमतरता आहे. पोलिस यंत्रणा 24 तास रस्त्यावर आहे. त्यामुळे त्यांचा विचार करून अगदी योग्य आणि काटेकोर नियोजन करून हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. चोरट्या मार्गाने दारू आणणाऱ्या, तसेच बेकायदा विक्री करणाऱ्या कुणालाही सुटी मिळणार नाही. संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, ""जिल्ह्यातील दारू दुकाने, बिअरबार, परमीट रूम सध्या सील असून, पुढे परवानगी मिळाल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांसमक्ष सील काढून स्टॉक तपासण्याच्या सूचना आहेत. यामध्ये गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाईच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत.'' 

दरम्यान गृह मंत्री देसाई यांनी ही मुलाखत दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी दारु दुकाने सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केला. त्यामुळे आजपासून (बुधवार) सातारा जिल्ह्यात दारु विक्रीस प्रारंभ हाेणार आहे. तरी मंत्री देसाईंच्या सूचनेप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर नवी जबाबदारी पडली आहे. 


एकतर्फी प्रेम अन् गहिवरले आई वडील

सातारा : वाईन शॉप उघडणार; टाेकन सिस्टीमने मिळणार दारु

आम्ही एकटे नाही, गृहमंत्री आमच्या सोबत... 

लॉकडाउनच्या काळात जनतेला अनेक लोकप्रतिनिधींचे दर्शन दुर्लभ झालेले असताना मंत्री शंभूराज देसाई मात्र, सातारा जिल्ह्यात रस्त्यावर उतरून पोलिस व जनतेचे मनोधैर्य वाढवताना दिसून येत आहेत. रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या आणि उन्हातान्हात होरपळणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना नुकतेच त्यांनी 1875 लस्सी पाकिटांचे वाटप केले. पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ते स्वतः दुचाकीवरून रस्त्यांवरून फेरफटका मारत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. आपण रस्त्यावर एकटे नाही तर गृहमंत्रीसुद्धा आपल्या सोबत आहेत ही भावना पोलिस, होमगार्डसह कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विविध घटकांत त्यामुळे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. तशा प्रतिक्रियाही जनतेसह अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आपल्याकडे येत असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्येही चक्क ज्ञानेश्‍वरी पारायण

चिंताजनक : खटाव पाठाेपाठ माणमध्येही कोरोनाची धडक; कऱ्हाड नव्वदीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com