दारूच्या नशेत चुलत्यावर वार; पोलिस घुसले शिवारात पण...

दारूच्या नशेत चुलत्यावर वार; पोलिस घुसले शिवारात पण...

कुकुडवाड : माण तालुक्यातील कुकुडवाड (कारंडेवाडी) येथे घरगुती वादातून पुतण्यानी चुलत्याचा सुरीने गळ्यावर सपासप वार करून खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडकीस आली आहे. लक्ष्मण अण्णा चव्हाण (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी संदीप वसंत चव्हाण(वय 26) हा घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिस आरोपीचा कसून तपास करत आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी लक्ष्मण चव्हाण, संदीप चव्हाण आणि त्याचे वडील वसंत चव्हाण हे सर्वजण एकाच कुटुंबात राहत होते. यातील मयत व आरोपी यांच्यात सतत दारू पिऊन वादातून त्यांच्यात अनेकवेळा मारहाण झाली होती. साेमवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. संदीप याने दारूच्या नशेत घरासमोर झोपलेल्या आपल्या चुलत्याच्या गळ्यावर सुरीने सपासप वार करून तेथून पळ काढला. लक्ष्मण यांना खोलवर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

या घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस शिवारात शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक श्री. महामुनी यांनी भेट देऊन आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशा सूचना केल्या आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वाघमोडे करीत आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारींना कऱ्हाडला येण्याच्या आमंत्रणाचा निर्णय

फलटण शहर : दारुच्या पैशांवरुन वादावादी; एकाचा मृत्यू

घरी परतण्याची ओढ ठरली घातकी; अंबेनळी घाटातील अपघातात एक ठार

ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com