भाजप व जनशक्तीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

भाजप व जनशक्तीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर
भाजप व जनशक्तीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

कऱ्हाड (सातारा): येथील नगराध्यक्षा सौ. रोहणी शिंदे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांना वगळून जनशक्ती विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आज (शुक्रवार) मेन रोडवरील आझाद चौकातील रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन केले. नगराध्याक्षांसह भाजपच्या नगरसवेकांना कोणतीही कल्पना न देता पार पडलेल्या भूमीपूजनाने भाजप व जनशक्तीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्यातील वादाची दरी दिवसेंदिवस वाढत आहे.

स्थायी समितीच्या बैठकीमुळे कालच त्यांच्यात वाद असल्याचे स्पष्ट झाले होते. सलग दुसऱ्या दिवशीही नगराध्यक्षा सौ. शिंदे व भाजपला जमेत न धरता जनशक्तीने केलेल्या प्रकारामुळे त्यांच्यात राजकीय हेवेदावे वाढण्याची शक्यात आहे. नगराध्यक्षा नसल्याने मुख्याधिकारी यशवंत डांगेही तेथे उपस्थीत नव्हते. मात्र, अन्य विभागाचे अधिकारी तेथे उपस्थीत असल्याने त्यांच्यावरही आता प्रेशर आले आहे. भाजपच्या नगराध्यक्षा सौ. शिंदे सत्ताधारी असून अल्पमतात आहेत. तर विरोधी नॉजनशक्ती आघाडी बहुमतात आहे. जयवंत पाटील उपाध्यक्ष आहेत. दोन्ही आघाडीत काही दिवसांपासून जोरदार मतभेद आहेत. ते कोणत्या कोणत्या कारणाने नेहमीच चव्हाट्यावर येतात. कालही स्थायी समितीवरून ते चव्हाट्यावर आले होते. नगराध्यक्षांनी बोलावलेल्या स्थाय़ी समितीच्या जनशक्ती आघाडीने पाठ फिरवल्याने स्थायी समितीची बैठक रद्द करण्यात आली. मुख्याधिकारी डांगे यांनीही त्याबाबत कबूली दिली होती. दोन्ही गटात वाद अशल्याने बैठक रद्द जाल्याने दोन्ही आघाड्यात समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला जनशक्तीने मात्र साफ नकार दिल्याचे आजच्या त्यांच्या कृतीवरून दिसून येते.

आज सकाळी जनशक्ती आघाडीने येथील आझाद चौकात रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. त्या कार्यक्रणाची सुताराम कल्पनाही नगराध्यक्षा सौ. शिंदे यांना नव्हतीच त्यांच्यासह भाजप एकाही नगरसेवकाला त्याची माहिती देण्यात आली नव्हती. त्याचे रितसर निमंत्रणही दिले नव्हते. त्यांच्या अनुउपस्थीतीच जनशक्तीने नारळ पोडून रस्त्याचे भूमीपूजन केले. यावेळी उपाध्यक्ष जयवंत पाटील, बांधकाम सभापती बाळासाहेब यादव, नगरसेविका श्रीमती आशा मुळे, महेश कांबळे, ओंकार मुळे यांच्यासह जनशक्तीचे अन्य नगरसेवक व समर्थक उपस्थित होते. तेथे नगराध्यक्षा सौ. शिंदे यांची अनुउपस्थीत चर्चेचा विषय ठरली होती. त्यांना बोलावण्यात आले की नाही याचाही नंतर चर्चा रंगली होती. उपाध्यक्ष जयवंत पाटील, बांधकाम सभापती बाळासाहेब यादव यांच्यासह जनशक्तीचे सगळे नगरसेवक त्या कार्यक्रमास उपस्थीत होते. लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्याही आघाडीचे नगरसेवक उपस्थित नव्हते. त्यामुळे पालिकेत राजकीय़ डावपेचाला सुरू आहेत. त्यामुळे शह-काटशहाच्या राजकारणालाही गती येण्याची शक्यता आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com