सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार

कऱ्हाड (सातारा): सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदीर, जंगली भ्रमंती वाटा विकसीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध होणार आहे.

कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतो आहे. त्याच्या उत्तर बाजूला प्रतापगड व दक्षिण टोकाला आंबा म्हणजे विशाळगड आहे. दोन्ही ऐतिहासिक किल्ल्यांच्या मध्ये साकारणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला निर्सगाची मोठी देणगीच मिळालेली आहे. त्याचा विचार करून २००0 मध्ये सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाची येथे घोषणा झाली आहे. त्यातच 2002 मध्ये येथे जागतीक वारसा स्थळ म्हणून या भागाला घोषीत करण्यात आले आहे. त्याचा अंदाज घेवून पर्यन विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखड्यामध्ये दहा वर्षाच्या विकासाचा विचार केला आहे. व्य़ाघ्र प्रकल्पात समाविष्ठ होणाऱ्या धबधब्यापासून किल्ल्यांवर काय सुविधा देता येतील, याचा विचार आराखड्यात करण्यात आला आहे. सध्या दंगल भ्रमंतीच्या वाटा विकासीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक वाटेसाठी स्वतंत्र निधी देण्यात आला आहे.

व्याघ्र प्रकल्पातील डोंगरावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अभ्यासकांची गर्दी असते. पठारावरील जैवविविधतेचा अभ्यास करणारे तज्ञ तेथे नेहमीच येत असतात. इतर वेळी मृतप्राय झालेली पठार पावसाळ्यात जीवंत होतात, हेच भागाचे वैशिष्ठ्य़ आहे. त्याचाही अभ्यास करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. त्याचाही विचार आराखड्यात करण्यात आला आहे. पावसाळ्यात जीवंत झालेल्या पठारवरील फुले, साप, सरडे, बेडूक व पठारावरील सुक्ष्म जीवांचा अभ्यास व त्याची नोंदणीचे काम पावसाळ्यात करण्यासाठी होणारी गर्दी महत्वाची असते. पवनचक्क्यांचा तालुका म्हणून त्याची ख्याती सर्वदूर आहे. त्यामुळे पवनचक्क्यांचे स्थळ असलेल्या वनकुसवडे पठारावरही पर्यटकांची विशेष गर्दी असते. तो भागही पर्यटनाच्या सुविधात आणण्याची तरतूद त्यात करण्यात आली आहे. त्याशिवाय खासगी कंपन्यांकडूनही येथे सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नाणेल येथे टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था खासगी संस्थेकडून करण्यात आली आहे. मणदूर-जाधववाडी येथे चांदोलीचे रिसॉर्ट आहेत. व्याघ्र प्रकल्पात कोयना शिवसागर जलाशय व चांदोली, वसंत सागर महत्वाची दोन धरण आहेत. त्याच्या जलाशयात बोटींगची सुविधा करणार आहेत. ते काम सुरत यंत्रणेच्या परवानगीनंतर सुरू होणार आहे.

विकासीत होणारी ठिकाण ः
* किल्ले ः

महिमागड (रघुवीर घाटात),
वासोटा,
पालिचा किल्ला,
जंगली जयगड,
भैरवगड,
प्रचितीगड.

*डोंगरावरील मंदिर ः
उत्तरेश्वर,
पर्वत,
चकदेव,
नागेश्वर,
उदगीर

*धबधबे ः
ओझर्डे धबधबा,
कंदार डोह

* जंगल भ्रमंती वाटा ः
मेट इंदोली ते वासोटा.
नवजा ते जंगली जयगड.
कोठावळे ते भैरवनगड.
पानेरी ते पांढरपाणी.
झोळंबीचा सडा.
खुंदलापूर ते झोळंबी.
चांदोली ते धरण निवळे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com