वीकेंडला फक्त ऑनलाईनधारकांना "कास'ला प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सातारा : कास पठार एक सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पर्यटकांना कास पठाराचा नजराणा शिस्तबध्द पध्दतीने पाहता यावा यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कास पठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन पध्दतीने आरक्षण करण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी दिली आहे.

दररोज सकाळी 7 ते 10, सकाळी 10 ते 1, दुपारी 1 ते 4 , सायंकाळी 4 ते संध्याकाळी 7 वाजता असे प्रत्येकी तीन तासाला 750 प्रमाणे 3000 पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे निसर्गाच्या अदभुत पुष्प खजिन्याचे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे 16 सप्टेंबर पासून शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी फक्त ऑनलाईन आरक्षण केलेल्या पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही श्री. अंजनकर यांनी नमूद केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news kas pathar online booking entry