कोरोना काेरियात क्वारंटाईन खंडाळ्यात

कोरोना काेरियात क्वारंटाईन खंडाळ्यात

खंडाळा (जि. सातारा) : खंडाळा येथे गेले 40 दिवस वास्तव्यास असलेल्या संशयित रुग्ण कोरियात परतल्यानंतर तेथे पॉझिटीव्ह आढळला. याबाबतची माहिती भारतीय परराष्ट्र खात्यास प्राप्त झाल्यानंतर ही माहिती सातारा जिल्हा प्रशासनास कळविण्यात आली. दरम्यान या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या 30 जणां पैकी 25 जणांना शिरवळ येथे आयसोलेशन वॉर्ड येथे तर पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबंधित अनुमानितांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांनी दिली.

गेले 21 मार्च पासुन हा रुग्ण खंडाळा येथे वास्तव्यात होते. 28 एप्रिलला कोरियाला जाण्यासाठी खंडाळा येथुन निघुन गेला. काेरियात उच्चपदावर असल्याने तेथील विद्यापीठाने भारतात असलेल्या सर्वांसाठी खास विमान पाठवुन कोरिया देशात बोलावले होते. माञ या व्यक्तीची तपासणी करावी असा स्पष्ट निर्देश असल्याने या व्यक्तिची तपासणी मुबंई येथे विमानतळावर करण्यात आली. तेथे त्यांचा रिपाेर्ट निगेटीव्ह आला. तेथे (कोरिया) पुन्हा तपासणी झाल्यानंतर माञ संबंधितांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. याबाबतची माहिती तेथील प्रशासनाने भारतीय परराष्ट्र खात्यास कळविली. त्यानंतर ही माहिती सातारा जिल्हा प्रशासनापर्यंत पाेहचली.
 
यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील प्रशासनाने तत्काळ हालचाली केल्या. संपर्क लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर खंडाळा येथील परिसरात फवारणी ही करण्यात आली. तसेच नगरपंचायत प्रशासनाने मेडिकल सेवा वगळता सर्व दुकाने, भाजीपाला सर्व बाजारपेठ अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. 

शहरात बाहेर पडण्याऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच प्रत्येक चौकात पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. खंडाळा येथे सातारा जिल्ह्याचा पहिल्या रुग्ण सापडल्यानंतर हा दुसरा रूग्ण वास्तव्यास असल्याने शहरात पुन्हा सर्व्हेक्षण करण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून 31 पथके नेमली असून सहा पर्यवेक्षकांची नेमणूक केली असल्याचे डॉ . पाटील यांनी सांगितले . 

23 एप्रिलला दुबई वरुन आलेली सातारा जिल्ह्याचा पहिला कोरोना बाधित महिला सापडल्यानंतर खंडाळा शहरात सर्व जण हायअर्लट होते. दरम्यान सर्व काळजी घेऊन महिना उलटत नाही .तोपर्यत कोरियावरुन वास्तव्यास आलेल्यांला व्यक्तिला ही कोरोनाची बाधा झाल्याने खंडाळा पुन्हा हायअर्लट झाले आहे.

जिवाची बाजी लावून लढणारेच पॉझिटिव्ह; याला जबाबदार कोण ?

साेनके, तरडगावला काेराेनाबाधित आढळले; साताराची चिंता वाढली

फलटण येथील महिला कोरोनामुक्त

दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असलेली फलटण येथील कोरोना बाधित महिलेचे आज चौदा दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह  आले. आता ती कोरोनामुक्त झाल्याने  तिला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या एकूण 9 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
तसेच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 42, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 77,  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 21, तसेच कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 5 अशा एकूण 145 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.

तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 27 (आरोग्य कर्मचारी-12, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-1,  कोविड बाधित रुग्णांचा निकट सहवासित-9, गरोदर माता-5), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 4 (कोरोना बाधिताचे निकट सहवासित-3, कोरोना बाधित रुग्णाचा चौदा दिवसानंतरचा नमुना-1),  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 74 (आरोग्य कर्मचारी-24 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-35, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 1, गरोदर माता-12, प्रवास करुन आलेले-2),  उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 32 (आरोग्य कर्मचारी-1, कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-28, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे-3,) ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 3 (आरोग्य कर्मचारी), ग्रामीण रुग्णालय वाई येथे 26 (कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित-26,  अशा एकूण 166 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

सातारकरांना घरोघरी दूध मिळणार

काय सांगता ! दारू दुकानच अनलॉक व्हयं

औषध हवयं ? घरा बाहेर पडू नका...घरपोच मिळणार

दिनांक 2.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

  •  1.    क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा    1584
  • 2.    कृष्णा हॉस्पीटल, कराड-    548
  • 3.    एकूण दाखल -    2132
  •     प्रवासी-261, निकट सहवासीत-1200, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-270,आरोग्य सेवक-341, ANC/CZ-60 एकूण= 2132
  • 4.    अनिर्णित नमुने-    7
  • 5.    14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    21
  • 6     एकूण घेतलेले नमुने    28
  • 7.    कोरोना बाधित अहवाल -    74
  • 8.    कोरोना अबाधित अहवाल -    1606
  • 9.    अहवाल प्रलंबित -    452
  • 10.    डिस्चार्ज दिलेले-    1615
  • 11.    मृत्यू-    2
  • 12.    सद्यस्थितीत दाखल-    515
  • 13.    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 1.5.2020) -    2168
  • 14.    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    2168
  • 15.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    782
  • 16.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    1386
  • 17.    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    253
  • 18.    आज दाखल    0
  • 19    यापैकी डिस्जार्ज केलेले-    179
  • 20.    यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0
  • 21.    अद्याप दाखल -    74

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com