कास (सातारा) : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिने स्विकारले लाखाे रुपये अन्...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

संबंधित फिर्यादी महिला व तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हवालदार आतिष घाडगे, अतुल तावरे, श्रीनिवास देशमुख, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, सतीश बाबर, सुनील भोसले, कोमल जाधव, प्रियांका जाधव आदींनी ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत. 

सातारा : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील दीड लाख रुपये स्वीकारताना फिर्यादी महिला व तिच्या साथीदाराला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या फिर्यादीवरून जवान संतोष जिमन (रा. कारी, ता. सातारा) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना संबंधित महिला ही तपासाला सहकार्य न करता दिशाभूल करणारी माहिती देत होती. त्याचप्रमाणे जिमन व त्यांच्या नातेवाईकांना गुन्हा दाखल करण्यापूर्वी पाच लाख रुपयांची मागणीही केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मागे घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी संबंधित महिलेने जिमन यांचे नातेवाईक संतोष किर्दत यांच्याकडे केली. परंतु, दोन लाख रुपये देण्याची संतोष यांची तयारी नव्हती. त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल (ता. 15) शाहूपुरी पोलिस ठाण्यात खंडणी मागणीची फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना फिर्यादी महिला व तिच्या साथीदाराने कालच किर्दत यांना फोन केला व समक्ष भेटले. त्यावेळी त्यांनी दोन लाख रुपयांपैकी दीड लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याची तसेच गुन्हा फायनल झाल्यावर 50 हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

संतोष यांना दीड लाख रुपये घेऊन अजिंक्‍य गणेश मंडळाजवळ असलेल्या मेडिकल दुकानाजवळ येण्यास त्यांनी सांगितल्याचेही सहायक पोलिस निरीक्षक शितोळे यांना निष्पन्न झाले. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार पंच व फोटोग्राफर घेऊन सापळा लावला. त्या वेळी संबंधित महिला तेथे आली. तिने संतोष यांना कस्तुरबा गांधी दवाखान्याच्या जवळील बोळात नेले. तेथे तिने ठरल्याप्रमाणे दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. तेथेच या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे असलेले दीड लाख रुपये जप्त करण्यात आले. संबंधित फिर्यादी महिला व तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हवालदार आतिष घाडगे, अतुल तावरे, श्रीनिवास देशमुख, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, सतीश बाबर, सुनील भोसले, कोमल जाधव, प्रियांका जाधव आदींनी ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत. 

हेही वाचा : ...म्हणून उज्ज्वल निकमांनी दिला आंध्र प्रदेशातील खटल्याचा दाखला

अवश्य वाचा :  पोलिसांच्या एका हाकेत हजारो महिला पडल्या घराबाहेर

जरुर वाचा : सातारा : इयत्ता बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर

हेही वाचा : कऱ्हाडला टोळी युद्ध; अग्नीशमन दलाच्या गाडीवर दगडफेक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahupuri Police Arrested Two Suspects In Satara

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: