esakal | कऱ्हाडला टोळी युद्ध; अग्नीशमन दलाच्या गाडीवर दगडफेक
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडला टोळी युद्ध; अग्नीशमन दलाच्या गाडीवर दगडफेक

पाेलिस दलाच्या माध्यमातून सातारा शहरात महिलांना निर्भयपणे वावरता यावे त्यांच्या आत्मविश्वास वाढावा याठी पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातुपते यांनी निर्भया वाॅकचे आयाेजन केले. त्यास महिलांचा माेठा प्रतिसाद लाभला. दूसरीकडे याच सातारा जिल्ह्यात महिलांना रात्री दीडपर्यंत कराड पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसावे लागले. निमित्त हाेते एका टाेळी युद्धाचे.

कऱ्हाडला टोळी युद्ध; अग्नीशमन दलाच्या गाडीवर दगडफेक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : येथील बुधवार पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास दाेन गटात तुफान राडा झाला. काही संतप्त युवकांनी दुचाकी जाळून खाक केली. काही ठिकाणी दगडफेकही झाली. त्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. दगडफेकीत पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच फुटली. या प्रकरणी पाेलिसांनी दोघांना अटक केली आहे.
 
या घटनेची अधिक माहिती अशी बुधवार पेठेत मारामारी झाल्याचे समजातच रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील, फौजदार शिवराम खाडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी त्वरीत घटनास्थळी पोचले. संतप्त जमावाला श्री. पाटील यांनी संशयितांना अटक करण्याचा शब्द दिला. त्यानंतर जमाव शांत झाला. चौकात जमलेल्या लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांना रात्रभर कसरत कारावी लागली. त्या परिसरातील वातावरणात तणाव होता. पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी जमावाने जाळेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. ती कोणाची आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत.

या घटनेत एका टोळीने पिस्तुल नाचवत दहशत माजवली. त्या प्रकाराने संतप्त महिला रात्री दीडपर्यंत पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्या होत्या. "गरीबाने जगायच तरी कस? आमची पोरं ते बिनधास्त मारत्यात. त्यांच्याकडे माणसे मारायची घोडे (पिस्तुल) आहेत. अशी किती घोडी आहेत त्यांच्याकडे? त्याची आम्हाला आता भिती वाटायला लागलीय, असे काही महिलांनी गाऱ्हाणे मांडत टोळ्यांकडील पिस्तुलांकडेही पोलिसांचे लक्ष वेधले.

पाेलिस दलाच्या माध्यमातून सातारा शहरात महिलांना निर्भयपणे वावरता यावे त्यांच्या आत्मविश्वास वाढावा याठी पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातुपते यांनी निर्भया वाॅकचे आयाेजन केले. त्यास महिलांचा माेठा प्रतिसाद लाभला. दूसरीकडे याच सातारा जिल्ह्यात महिलांना रात्री दीडपर्यंत कराड पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसावे लागले. निमित्त हाेते एका टाेळी युद्धाचे.

वाचा : पोलिसांच्या एका हाकेत हजारो महिला पडल्या घराबाहेर

हेही वाचा : काश्‍या सोन्यासाठी झाला कर्दनकाळ; सहा महिलांच्या खुनाचे प्रकार उघडकीस

सविस्तर वाचा : सातारा पाेलिसांच्या असंवेदनशिल कामकाजा विषयी

जरुर वाचा : व्हॅलेंटाईन डे पुर्वीच त्याला जेलची हवा; गर्भ वाचला

loading image