शानभाग विद्यालयाच्या मुलींनी 'डेक्कन'ला हरविले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

सातारा जिल्हा ही बास्केटबाॅल खेळाची पंढरी समजली जाते. या जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आता बास्केटबाॅलच्या स्पर्धा हाेऊ लागल्या आहेत. पाचगणी येथील बिलीमाेरीया हायस्कूलने नुकतीच 17 वर्षाखालील वयाेगटाची आणि खूल्या बास्केटबाॅल स्पर्धेचे आयाेजन केले हाेते. 

सातारा : पाचगणी येथील बिलीमोरीया हायस्कूल येथे झालेल्या (कै.) जयता भुटा स्मृती करंडक राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत येथील के.एस.डी शानभाग विद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा 17 वर्षाखालील मुलांच्या आणि मुलींच्या वयोगटात घेण्यात आली.

स्पर्धेतील मुलींच्या गटात के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि पुण्यातील डेक्कन जिमखाना या संघात अंतिम लढत झाली. सामन्याच्या प्रारंभापासून शानभाग विद्यालयाच्या मुलींनी समन्वयचा खेळ केला. मध्यमंतरास शानभाग विद्यालयाने निर्णायक आघाडी घेतली. खेळाच्या तिसऱ्या सत्रात डेक्कनच्या खेळाडूंनी आक्रमणावर भर दिला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. शानभाग विद्यालयाने हा सामना 69 - 61 असा आठ गुणांनी जिंकला. तत्पुर्वी शानभाग विद्यालयाने उपांत्य फेरीत सातारा इंग्लीश मिडीयम स्कूल संघाचा 57 - 37 असा पराभव केला होता.

यशस्वीतांना अदिती एज्युकेश सोसायटीच्या संचालिका दिव्या गोरादिया आणि अदिती गोराडिया यांच्या हस्ते शाळेचे ऍडमिनीस्ट्रेटर पकंज चव्हाण, सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सदस्य सिद्धार्थ लाटकर यांच्या उपस्थित पारितोषिक देण्यात आले. यावेळी अदिती गोराडिया यांच्या हस्ते शानभाग विद्यालयाची कर्णधार चैतन्या राजे हिला उत्कृष्ट खेळाडूचे सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शानभाग विद्यालयाच्या संघात चैतन्या राजे, आर्या मोरे, मानसी घाडगे, साक्षी खेतमार, जन्मदा पवार, प्रज्ञा नलवडे, प्रांजली पवार, साक्षी किर्दत, पूर्वा केंजळे, सिया दाभाडे, सानिका पोळ, कृपा नेटके यांचा समावेश होता. यशस्वीतांना अभिजीत मगर व शंकर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतांचे ज्येष्ठ क्रिडा संघटक रमेश शानभाग, उषा शानभाग, ऍड. विलास आंबेकर, संचालिका आचल घोरपडे, मुख्याध्यापक (माध्यमिक) रेखा गायकवाड, मुख्याध्यापक (प्राथमिक) भाग्येश कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. 

सकाळ स्कूल क्रिकेट लीगचे सविस्तर बातम्या वाचा 

गुरुकुलच्या विजयात शार्दुल, आर्य, अद्वैतची चमकदार कामगिरी

#SSCL निर्मला कॉन्व्हेंट, शानभाग विद्यालय विजयी

#SSCL न्यू इंग्लिश स्कूल,गुरुकुल स्कूल विजयी

#SSCL निर्मलाची शानभाग वर मात; पोदारचा धावांचा पाऊस

#SSCL अखेर शानभाग विद्यालय तरले

#SSCL निर्मलाच्या आदित्य नलावडेने रचला इतिहास;आज उपांत्य फेरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shanbhag Vidyalay Won In Billimorias State Level Basketball Tournament