राष्ट्रवादीतील गळतीला शरद पवार जबाबदार: उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

शिवेंद्र आणि माझ्यात ठिणगी टाकणारे आता नाहीत
शिवेंद्रराजे आणि माझा पुढील प्रवास सुरळीत असेल. आता आमच्यात ठिणगी टाकणारे नसतील, त्यामुळे काहीही अडचण येणार नाही. आमच्यात वाद लावून मजा पहायची होती, पण आता तसे होणार नाही, असे उदयनराजेंनी सांगितले.  

सातारा : कामे झाली नाहीत तरी चालेल पण मी माझा झालेला अपमान कधी सहन करत नाही. मग, कोणीही असो. माझा येथे अपमान झाला आणि एकही काम झाले नाही. पक्षाचे प्रमुख म्हणून पवार यांनी लक्ष घातले असते तर पक्षाला ही गळती लागली नसती, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. 

मी पस्तावतोय बॅनरने कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतर उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाले होते. 'बीबीसी'शी बोलताना उदयनराजेंनी राष्ट्रवादीतील गळतीला शरद पवारांनाही जबाबदार धरले आहे.

'मुझे छोड दो भैया' म्हणूनही ते नराधम थांबले नाहीत

मै जहाँ खडा हू, लाईन वहासे शुरु होती है असे म्हणत उदयनराजे म्हणाले, की भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी पवारसाहेबांना त्यांच्या निवासस्थाऩी भेटलो. तेव्हा चर्चा झाली. त्यापूर्वीही अनेकदा सात-आठ वर्षांपासून मी त्यांच्या कानावर विषय घातले होते. आईसाहेबांच्या सांगण्यावरून मी अपक्ष असताना राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हा साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यांनी पक्ष वाढीसाठी आमच्या घरी आले होते आणि आईसाहेबांशी चर्चा करून मी राष्ट्रवादीकडून लढावे असे सांगितले होते. लोकांच्या हक्कासाठी भांडत असताना त्याच जिल्ह्यातील काँग्रेस नेते माझ्यावर खंडणीचा आरोप करत होते. शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी मी लढलो. माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले. ईव्हीएमबाबत माझ्या मनात शंका होती. पण, बारकाईने मी विचार केला की मी विरोधी पक्षाचा खासदार असतानाही अनेक कामे माझ्या मतदारसंघात झाली. 

HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण

शिवेंद्र आणि माझ्यात ठिणगी टाकणारे आता नाहीत
शिवेंद्रराजे आणि माझा पुढील प्रवास सुरळीत असेल. आता आमच्यात ठिणगी टाकणारे नसतील, त्यामुळे काहीही अडचण येणार नाही. आमच्यात वाद लावून मजा पहायची होती, पण आता तसे होणार नाही, असे उदयनराजेंनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar responsible for leaders left NCP says Udyanraje Bhosale