व्हिडिओ - शुक्रवारी सांगली जिल्हा बंदची हाक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती 
उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने शुक्रवारी (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे.  अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी दिली आहे. 

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती 
उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने शुक्रवारी (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे.  अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी दिली आहे. 

हे पण वाचा - सिगारेट ओढण्यास माचिस न दिल्याने या तिघांनी केले असे कृत्य... 

खासदार राऊत यांनी छत्रपती उदनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे आज सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवप्रतिष्ठानने देखील खासदार राऊत यांचा निषेध केला आहे. तसेच त्यांच्या निषेधार्थ संपूर्ण सांगली जिल्हा बंद ठेवून राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशारा भिडे यांनी दिला आहे.
  याबाबत बोलतीवी भिडे म्हणाले, "छत्रपती उदयन महाराज 
यांच्याबद्दल संजय राऊत यांनी उद्‌गार काढून अत्यंत घोर अपमान केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. हा अपमान केवळ छत्रपती उदयन महाराज यांचा नसून संबंध देशाला
 प्राणभूत असलेल्या छत्रपती परंपरेचा हा अपमान आहे, असे आम्ही मानतो.

हे पण वाचा - हुतात्मा दिनावरही कर्नाटक पोलिसांची घातली बंदी... 

त्यामुळे राऊत यांच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात गाव पातळीपर्यंत बंद राहील. उदयन महाराज यांच्याविरोधात ज्यांनी असे निंद्य वर्तन केले, त्या राऊत यांना तत्काळ पदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्त करावे. अन्यथा संबंध महाराष्ट्रभर जिल्ह्या जिल्ह्यातून असेच बंदचे आवाहन केले जाईल. संपूर्ण महाराष्ट्रभर याविरोधात आवाज उठवला जाईल.''

हे पण वाचा - तिने पहिला पगार दिला शेतकरी चळवळीला..! 

शुक्रवारी सांगली बंद ठेऊन खासदार राऊत यांचा निषेध केला जाणार आहे. तसेच निषेधाचा भाग म्हणून सांगलीतील मारूती चौकात सकाळी दहा वाजता सर्व  कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. निषेधासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भिडे यांनी
 प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Pratishthaवn calls forSangli district closure on Friday