Vidhan Sabha 2019 : शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे पीक विम्याबाबत गप्प का? : उद्धव ठाकरे

Shivsena-Uddhav-Thackeray
Shivsena-Uddhav-Thackeray

सांगोला : ''शिवसेनेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे. दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत करीत होती. शिवसेना पीक विम्यासाठी सत्तेत असूनही सतत आवाज उठवत होती. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे पिक विम्यासाठी गप्प का होते?'' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

तसेच सेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी आम्हाला जनतेची साथ हवी आहे. सेना-भाजपमधील मतभेद हे जनतेच्या प्रश्नासाठीच आहेत. तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रश्न पूर्ण करण्यासाठी शहाजी पाटील यांना निवडून द्या, असे आवाहनही ठाकरेंनी केले.

सांगोला येथे सोमवारी (ता.14) शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांच्या प्रचारसभेत ठाकरे बोलत होते. यावेळी तानाजी सावंत, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, कल्याण काळे, श्रीकांत देशमुख, भाऊसाहेब रुपनर, नगराध्यक्षा राणी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकरे म्हणाले, तालुक्यात विकासाचे अनेक प्रश्न आहेत. भाजप-सेनेत मतभेत असले तरी ते शेतकऱ्यांसाठी आहेत. आमचे सरकार आल्यावर सरकारी विमा कंपनी स्थापन करून पीक विमे उतरविणार आहे. अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना वार्षिक दहा हजार रुपये देणार आहोत.

शेतकऱ्याच्या हक्कासाठी मला जे पटणार नाही त्यास जरूर विरोध केला जाईल. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे लढायला उमेदवार नाहीत. विरोधक म्हणतात, या सरकारने काय केले? त्यांनी राज्यात फिरून बघा, तुम्हाला विकास दिसेल. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती दिली जाईल. सांगोला तालुक्यातील पन्नास वर्षाची परंपरा यावेळी मोडीत काढण्यासाठी मतदारांनी साथ दिली पाहिजे.

आम्ही जाती-पातीचे राजकारण कधीच केले नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा देणाराच आमचा धर्म आहे. पोठाला कोणताही धर्म-जात नसते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमी प्रयत्न करणार आहोत.

सध्या जातीवादी प्रचार केला जात आहे. भगवा हीच आमची जात असून तालुक्याच्या विकासासाठी एकवेळ संधी द्या, असे भावनिक आवाहन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांना धनगर समाजातर्फे काटी, घोंगडे आणि गजीढोल भेट देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com