
Miraj : मिरज शहरात गणेशोत्सव मंडळांच्यावतीने रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढून गणरायाचा आगमन साेहळा सुरू असतानाच एका मंडळाच्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बाबासाहेब कलकुटगी (वय ५०) असे मृताचे नाव असून, रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.