श्री सिद्धेश्‍वर मंदिरात साकारणार दगडी सभामंडप 

 shri saiddhesvara mandir sakarnar dagadi sabhamandapa
shri saiddhesvara mandir sakarnar dagadi sabhamandapa

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर मंदिराचा कायापालट व्हावा यासाठी मंदिरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे सिद्धेश्‍वर महाराजांच्या मंदिराच्या समोर असणारा लोखंडी सभामंडप काढून त्या ठिकाणी दगडी सभामंडप तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. 
हेही वाचा : म्हणून सुरू आहे तरूणांची भटकंती 

सभामंडपासाठी सुमारे 700 ते 800 टन काळे दगड

सिद्धेश्‍वर मंदिरात 100 वर्षांपूर्वीचे लोखंडी सभामंडप होते. सभामंडप पूर्णपणे गंजल्याने ते सभामंडप पाडण्यात आले आहे. त्याच्या जागी आता दगडी सभामंडप बांधण्यात येणार आहे. सध्या त्याचा ढाचा तयार करण्यात आला आहे. या दगडी सभामंडपासाठी सुमारे 700 ते 800 टन काळे दगड लागणार आहेत. त्यापैकी 300 ते 400 टन काळे दगड आणण्यात आले आहेत. हे दगड कलबुर्गी जिल्ह्यातील अरळगुंडी येथून मागविण्यात आले आहेत, अशी माहिती श्री सिद्धेश्‍वर देवस्थान मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली. 
या सभामंडपाचे नक्षीकाम बंगळुरू येथील आर्किटेक्‍टकडून करून घेण्यात आले आहे. 
हेही वाचा : का आहे परदेशी पाहुण्यांना सोलापूरचे आकर्षण 
सभा मंडपासाठी लागणार सहा कोटी 
या सभामंडपाचे कामसुद्धा त्यांनाच देण्यात आले आहे. या कामाला किमान दोन ते अडीच वर्षे लागणार आहेत. या कामासाठी एकूण पाच ते सहा कोटी रुपये खर्च येणार आहे. हा सभामंडप 90 बाय 160 फुटांचा असणार आहे. त्याचबरोबर सिद्धेश्‍वर मंदिरात दररोज शेकडो भाविक येतात. त्यांना ध्यान साधनेसाठी एक विशेष ध्यानमंदिर बांधण्यात येणार आहे. त्याचेसुद्धा काम सुरू आहे. हे ध्यानमंदिर अंडरग्राऊंड असणार आहे. ध्यानमंदिर व सभामंडपाच्या आतील भागत ग्रेनाईडच्या फरशा बसविण्यात येणार आहेत. या सभामंडपाच्या वरच्या भागात 75 केव्हीचे सोलार पॅनल बसविण्यात येणार आहेत. सभामंडपाच्या आतील भागात सिद्धेश्‍वर महाराजांच्या जीवनावर आधारित तैलचित्र लावण्यात येणार आहे. सभामंडप आकर्षक दिसावे यासाठी झुंबर बसविण्यात येणार आहे. सभामंडपाच्या वरच्या भागात आकर्षक असे शिखर तयार करण्यात येणार आहे. 
हेही वाचा : आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या...प्लीज सगळ थांबवा आता 
75 हजार केव्हीचे सौर पॅनल उभारणार 
मंदिर समितीला लागणारी वीज स्वत:च तयार करणे आणि शिल्लक वीज महावितरणाला देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने 50 लाख रुपये खर्चून सौर पॅनल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 75 हजार केव्हीचे सौर पॅनल उभारले जाणार आहे. या निर्णयामुळे मंदिर समितीची दरवर्षी 12 ते 15 लाखांची बचत होणार आहे. 
भक्‍तांना आता मिळणार शुद्ध पाणी 
ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांच्या सिध्देश्‍वर यात्रे दरम्यान लाखो भाविकांची गर्दी दर्शनासाठी होते. या पार्श्‍वभूमीवर भाविकांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून मंदिर समितीने आरओ मशिन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेवणकर सराफ परिवाराच्या वतीने मंदिर समितीला आरओ मशिन दिले जाणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com