पंढरपूर: त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

अभय जोशी
मंगळवार, 18 जुलै 2017

या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की विवाहीत विद्यार्थीनी ही सोलापूर येथील गांधीनाथा महाविद्यालयात बीएचएमएस शिक्षण घेत होती. तीचे तिथे शिक्षणाचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर घरच्यांनी तिचा पाच वर्षापूर्वी विवाह करुन दिला होता. तिला चार वर्षाची मुलगी असून ती पती सोबत रहात होती.

पंढरपूर : सोलापूर येथील होमिओपॅथी महाविद्यालयात शिकणाऱ्या विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.16) रोजी येथील हरिनयन पार्कमध्ये दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर येथील तीच्या वर्गात शिकणाऱ्या विरेश कल्याणराव जलादी (रा. डब्लू आयटी कॉलेज समोर, ब्लॉक नं. 111-112, एकता नगर, सोलापूर) याच्याविरुध्द सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. 

या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की विवाहीत विद्यार्थीनी ही सोलापूर येथील गांधीनाथा महाविद्यालयात बीएचएमएस शिक्षण घेत होती. तीचे तिथे शिक्षणाचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर घरच्यांनी तिचा पाच वर्षापूर्वी विवाह करुन दिला होता. तिला चार वर्षाची मुलगी असून ती पती सोबत रहात होती. सहा महिन्यापूर्वी कॉलेजमध्ये तीच्या वर्गात असलेला आरोपी विरेश कल्याणराव जलादी हा फोनकरुन प्रेम आहे असे म्हणून तीला त्रास देत होता. या विषयी तिने पती व आई वडीलांना माहिती दिली होती. या सगळ्यांनी आरोपीशी फोन वरुन संपर्क साधून समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो ऐकत नव्हता. 

दरम्यान रविवारी ती कुटुंबीयांसह सोलापूरला गेली होती. तिथे त्यांनी आरोपीस बोलवून समजवण्याचा प्रयत्न केला परंतु नाद सोडणार नाही असे म्हणून आरोपी दमदाटी करुन निघून गेला. त्यानंतर सर्वजण पुन्हा पंढरपूरला आले होते. दुपारी तिने तिच्या राहत्या घरात विषारी औषध पिले. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. 

आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. आरोपी विरेशकुमार जलादीमुळे आपण आत्महत्या करत आहे. तो आपल्याला त्रास देतो, कॉल करतो, धमकी देतो. कॉलेज मध्ये बळजबरीने भेटायला बोलवतो. त्याने मेंटली व फिजीकली खूप त्रास दिला आहे. आता त्रास सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करत आहे असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे पुढील तपास करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Solapur news Married women suicide due to distress in Pandharpur