आमदार सोपल यांच्यासह 18 संचालक, 101 जणांवर गुन्हा

सुदर्शन हांडे
मंगळवार, 13 जून 2017

आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल होताच बार्शी शहरासह तालुक्यात तणावाचे वातावरण असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुका बंदची हाक दिली आहे.

बार्शी : येथील बार्शी उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार व गैरव्यवहार झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील १८ संचालक व १०१ कर्मचाऱ्यांविरोधात अपहार व फसवणुकीचा गुन्हा बार्शी पोलिसांनी दाखल केला आहे. 

जिल्हा विशेष लेखा परिक्षण अधिकारी व्ही. बी. डोके यांनीदाखल तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बाजार समितीच्या निधीत अपहार, जमिनीतील मिळणाऱ्या भाड्यामध्ये अपहार, नियमबाह्य कर्मचारी भरती, तसेच सुट्टीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत कर्मचाऱ्यांचे वेतन देऊन अपहार करण्यात आल्याचे आरोप लेखा परीक्षण अधिकाऱ्यांनी केले आहेत. 

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल होताच बार्शी शहरासह तालुक्यात तणावाचे वातावरण असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुका बंदची हाक दिली आहे. तर पोलिसांनी सर्वांना सहकार्य करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकरण 

  • सन २०१५-१६ या कालावधीतील हा अपहार व गैरव्यवहार, 
  • अपहार : 18 लाख ४३ हजार रुपये, 
  • गैरव्यवहार : ८६.५७ लाख रुपये 
  • एकूण : १ कोटी ५ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...!
#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​
धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​
डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​
आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​
श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​
गुजरातमध्ये स्मृती इराणींच्या दिशेने फेकल्या बांगड्या
जोगेश्वरीमध्ये शौचालयात आढळला पुरुषाचा मृतदेह

Web Title: solapur news ncp mla dilip sopal booked barshi agri market corruption