solapur crime news : जुगार खेळणाऱ्या 17 जणांना पकडण्यासाठी 14 पोलिसांचे पथक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur crime

विशेष म्हणजे कारवाईसाठी तब्बल दोन अधिकारी आणि 12 पोलिस अंमलदार होते.

सोलापूर : जुगार खेळणाऱ्या 17 जणांना पकडण्यासाठी 14 पोलिसांचे पथक

सोलापूर : येथील प्रभाकर वस्तीतील सार्वजनिक शौचालयाशेजारील पत्र्याच्या शेडमधील जुगार अड्ड्यावर(Gambling) जोडभावी पेठ पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन लाख 26 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार खेळणाऱ्या 17 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: ढिंग टांग : लोकतंत्र अने चूंटणीयंत्र!

रविवारी (ता. 9) रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना दुय्यम पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांना गुप्त बातमीदारामार्फत त्याठिकाणी जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिस पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पत्र्याच्या शेडमध्ये 17 लोक गोलाकार बसले होते. पोलिसांनी दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली. त्यांच्याकडून जवळपास सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई दुय्यम पोलिस निरीक्षक कुर्री यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक केतन मांजरे, पोलिस हवालदार आर. एन. थोरात, पोलिस नाईक एस. आय. जमादार, ए. ए. गवळी, के. पी. आरेनवरू, सोमनाथ थिटे, आर. के. घोडके, एस. यु. कसगावडे, वाय. एन. नागटिळक, सुहास गायकवाड, जी. एम. शेळके, डी. डी. काटे, बी. व्ही. माने यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: देशात दिवसभरात १.६८ लाख नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४,४६१

17 जणांवर कारवाईसाठी 14 पोलिस

जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दतील प्रभाकर वस्तीतील जुगार अड्ड्यावर जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या डी. बी. पथकाने कारवाई केली. पत्र्याच्या शेडमधील जुगार खेळणाऱ्या 17 जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे कारवाईसाठी तब्बल दोन अधिकारी आणि 12 पोलिस अंमलदार होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapurcrimegambling news
loading image
go to top