esakal | सोलापुरी चादरीच्या फॅशनेबल शर्टात झळकला अमेरिकन पॉपस्टार निक जोनास !
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापुरी चादरीच्या फॅशनेबल शर्टात झळकला अमेरिकन पॉपस्टार निक जोनास!

चादरीपासून फॅशनेबल शर्ट शिवला जातो व तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो, हे सिद्ध केलंय अमेरिकन पॉपस्टार निक अन्‌ बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनासने!

सोलापुरी चादरीच्या फॅशनेबल शर्टात झळकला अमेरिकन पॉपस्टार निक जोनास!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सोलापूरच्या पारंपरिक जेकार्ड चादरीची (Solapuri Chaddar) तसे पाहिल्यास जगभर ख्याती. सोलापुरी चादरीची वैशिष्ट्ये ही की, आकर्षक डिझाईन, जाडसर, प्युअर कॉटन (Pure Cotton), ऊबदार, टिकाऊपणा. परंतु, या चादरीचे इतर राज्यांतून डुप्लिकेशन सुरू होऊन सोलापुरी चादरीला (Solapur Chaddar) फटका बसला आहे. सोलापूरची चादर पांघरूण घेण्यासाठी उपयोगी आहे, असे म्हटले जाते. मात्र, त्याचा आकर्षक फॅशनेबल शर्टही (Fashionable shirts) शिवून घेतला जाऊ शकतो, हे कोणाच्या मनातही आलं नसेल. मात्र चादरीपासून फॅशनेबल शर्ट शिवला जातो व तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो, हे सिद्ध केलंय अमेरिकन पॉपस्टार निक जोनास (American popstar Nick Jonas) याने. हो आपली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Actress Priyanka Chopra) हिचा पती निक जोनासने!

हेही वाचा: शिक्षक, पोलिस उपनिरीक्षक ते महापालिका उपायुक्त! संघर्षमय यशोगाथा

निक जोनासने सेंट लुईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हा सोलापुरी जेकार्ड चादरीचा शर्ट घालून सहभागी झाला होता व त्याने "या कपड्यांनी ऊब दिली' असे म्हणत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामुळे सोलापुरी चादर पुन्हा एकदा जगात चर्चेचा विषय ठरली आहे. ही चादर सोलापुरातील चाटला टेक्‍स्टाईल इंडस्टीमध्ये तयार झाली असून, निकच्या या चादरीच्या शर्टाच्या बाहींवर "चाटला आर' हा ट्रेडमार्क लिहिलेला दिसून येतो. विशेष म्हणजे, चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीजचे मालक गोवर्धन चाटला यांनाही त्यांच्या फॅक्‍टरीमधून तयार झालेल्या चादरपासून शर्ट तयार झाल्याचा व तोही अमेरिकन पॉप सिंगर निक जोनासने तो घातलेला पाहून आश्‍चर्य वाटले. मात्र यामुळे सोलापुरी चादरीची कीर्ती आता फॅशनेबल शर्टाच्या माध्यमातून सातासमुद्रापर्यंत पोचल्याचे समाधान गोवर्धन चाटला यांनी "सकाळ'शी बोलतान व्यक्त केले.

हेही वाचा: झाडू घेतलेल्या हातात लेखणी! अण्णाभाऊंवर लिहून गायली चार गीते

'जुनं ते सोनं'चा प्रत्यय

निक जोनासने घातलेल्या चादरीच्या शर्टाच्या डिझाईनबाबत गोवर्धन चाटला म्हणाले, हे डिझाईन आमच्या आजोबांपासून चालत आलेलं आहे. इतकी जुनी डिझाईन्स आजही आकर्षक वाटते व त्यापासून शर्टही बनवला जातो, हे पाहून मला आश्‍चर्य वाटले. आमची उत्पादने देशभर पोचलेली आहेत.

आमचे अनेक डीलर्स आहेत. मात्र ही चादर कुठल्या डीलरकडून निकपर्यंत पोचली, हे आम्हाला माहीत नाही. तसेच आमच्या फॅक्‍टरीमध्ये देशातील विविध भागांतून फॅशन डिझाईन करणारे विद्यार्थी क्‍लस्टर व्हिजिटसाठी येतात. त्यांच्यामार्फत ही चादर अमेरिकेतील फॅशन डिझायनर्सपर्यंत गेली असावी. मात्र यामुळे सोलापुरी चादरीचा नावलौकिक या वेळी पांघरूण घेण्यासाठीच नव्हे फॅशनेबल वस्त्रांसाठी झाल्याचे समाधान वाटते. याबाबत आता सोलापुरातील तसेच देशातील फॅशन डिझायनर्सने आता पुढचे पाऊल टाकायला हवे.

- गोवर्धन चाटला, चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्री

loading image
go to top