पर्यावरणाचे आरोग्य जपणारे "ट्री-मॅन' डॉ. गुजरे ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणाचे आरोग्य जपणारे "ट्री-मॅन' डॉ. गुजरे !

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्‍यातील अनगर गावचे रहिवासी असलेले संतोष गुजरे हे पेशाने डॉक्‍टर आहेत. आपला प्रचंड व्यस्त असलेला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ते पर्यावरणाचं आरोग्य जपण्यासाठी परिश्रम घेताहेत.

पर्यावरणाचे आरोग्य जपणारे "ट्री-मॅन' डॉ. गुजरे !

सोलापूर : मनुष्याच्या जीवनात झाडांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. सध्याच्या कोरोना काळात झाडांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. सोशल मीडियावर तर झाडे लावा, हा मौलिक सल्ला लोक एकमेकांना देत आहेत. कारण, झाडं ही माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं आहे, याची जाण ठेवून केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही एक डॉक्‍टर प्रयत्न करत आहेत. ही कहाणी आहे संतोष गुजरे या डॉक्‍टरांची.

हेही वाचा: कांद्याचा वांदा ! बाजारपेठा बंद; उत्पादक शेतकरी अडचणीत

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्‍यातील अनगर गावचे रहिवासी असलेले संतोष गुजरे हे पेशाने डॉक्‍टर आहेत. आपला प्रचंड व्यस्त असलेला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ते पर्यावरणाचं आरोग्य जपण्यासाठी परिश्रम घेताहेत. 48 वर्षीय डॉ. संतोष गुजरे यांना वृक्षलागवडीची प्रचंड आवड. एमबीबीएस आणि डीएमआरईचं शिक्षण घेतल्यानंतर ते गेल्या 23 वर्षांपासून अनगर येथे वैद्यकीय सेवा बजावत आहेत. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले.

हेही वाचा: आमदारसाहेब, आता कोरोनाला पराभूत करूयात

कोल्हापुरातील परिसर हा प्रचंड हिरवाईने नटलेला. त्या निसर्गरम्य वातावरणामुळे त्यांना शिक्षणानंतर आपल्या गावी परत यावेसे वाटत नव्हते. पुढे त्यांनी अशीच हिरवाई आपल्या गावाकडे निर्माण करायचे, असा चंग बांधला आणि सोलापूर गाठले. गावतच हॉस्पिटल सुरू करून रुग्णांची सेवा करू लागले. लग्नानंतर त्यांना श्रेया नावाची मुलगी झाली. मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी झाड लावून केलं. पुढे त्यांनी वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेतली. दरवर्षी पावसाळ्यात झाडे लावू लागले. गेल्या पाच वर्षांत या वृक्षलागवड चळवळीला वेग दिला. यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग वृक्षलागवडीसाठी खर्च करू लागले.

हेही वाचा: मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला तब्बल 40 वर्षांनंतर संधी

डॉक्‍टरांनी आपल्या मुलीच्या नामकरणातील आणि वाढदिवसाचा खर्च वृक्षलागवडीवर केला. आजही ते आपल्या घरातील कार्यक्रमांचा खर्च झाडांवर करतात. स्वत:च्या पैशातून त्यांनी झाडे खरेदी करून रस्त्याच्या कडेला जिथे जागा दिसेल तिथे झाडे लावली. झाडे जगावे यासाठी लोखंडी ट्री-गार्डची देखील व्यवस्था केली. झाड जळू नये यासाठी त्यांनी टॅंकरने पाण्याची व्यवस्था केली. यासाठी लाखो रुपये खर्च केले. आज याच परिसरात बहुसंख्य झाडे डेरेदारपणे उभे आहेत. याचे श्रेय डॉक्‍टरांना जाते. अनगरसह आजूबाजूच्या पाच ते सहा गावातील नागरिकांनी डॉक्‍टरांनी चालवलेल्या या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला आहे. गावातील मंदिर, शाळा, समाजमंदिर एवढंच नाही तर स्मशानभूमीतही डॉक्‍टरांनी वृक्ष लागवड केली आहे.

हेही वाचा: "आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'

दरम्यान, डॉक्‍टर गुजरे यांना काही मित्रांनी वृक्षलागवडीच्या मोहिमेसाठी अधिक प्रमाणात झाडे उपलब्ध करून दिली. यातील काही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावली तर काही झाडे त्यांनी वृक्षप्रेमी लोकांना देऊन टाकली. पण तेही ते झाड लावणार आणि जगवणार या अटीवर. वृक्षलागवडीसाठी डॉक्‍टरांनी चिंच, वड, गुलमोहर आणि आंब्याची झाडे निवडली. कारण सावली देणारी आणि फळं देणारी झाडे लोक चांगली जपतात हा त्यांचा अनुभव आहे.

डॉक्‍टरांचे झाडावरचं हे अफाट प्रेम पाहून त्यांच्या वाढदिवसाला आणि कार्यक्रमाला लोक झाडेच भेट म्हणून देतात. मागील 20 वर्षांपासून गुजरे डॉक्‍टरांनी चालवलेल्या या वृक्षलागवड आणि संवर्धन चळवळीमुळे सोलापूर जिल्ह्यात त्याची "ट्री-मॅन' म्हणून ओळख झाली आहे.

Web Title: At Solapur Dr Santosh Gujre Has Been Planting Trees At His Own Expense For The Last Twenty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top