

Barshi fraud
बार्शी: बोरगाव (ता. बार्शी) येथे मागील चार-पाच वर्षांपासून ऊसतोडीसाठी मजूर पुरवणाऱ्या मुकादमाने यावेळीही बारा कोयत्यांची टोळी देतो, असे सांगून शेतकऱ्याकडून ६ लाख ५ हजार रुपये घेतले. पण टोळीही दिली नाही आणि रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांने दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात मुकादमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.