वर्ल्डकप टी-20 सामन्यावर सट्टा; जुळे सोलापुरात चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाच घेतानावर्ल्डकप टी-20 सामन्यावर सट्टा; जुळे सोलापुरात चौघांना अटक अटक

वर्ल्डकप टी-20 सामन्यावर सट्टा; जुळे सोलापुरात चौघांना अटक

सोलापूर : जुळे सोलापुरातील शालिन आर्केड अपार्टमेंट येथे टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यामधील सामन्यावर सट्टा खेळवत असताना पोलिसांनी चौघाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

हेही वाचा: राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

जुळे सोलापुरातील प्रेम नगर येथील शालिनी आर्केड अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 402 येथे बुधवारी (ता. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास टी-20 विश्वचषक क्रिकेट मॅचवर सट्टा बाजार सुरु असल्याची माहिती पोलिस आयुक्त हरीष बैजल यांना मिळाली. त्यावरून पोलिस आयुक्त कार्यालयाचे भरारी पथक प्रमुख सपोनि जीवन निरगुडे यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील व पथकाने छापा टाकला.

हेही वाचा: राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ?

तेव्हा तेथे संशयित अमोघ आनंद साखरे (वय 24, रा. पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर), नागेश सुभाष यळमेली (वय 33, व्यवसाय- इंजिनिअर, रा. शाहीर वस्ती, सोलापूर), शिवराज पांडुरंग हवके (वय 32, व्यवसाय- मजुरी, रा. भवानी पेठ, सोलापूर) व प्रभाकर राजशेखर उपासे (वय 28, व्यवसाय- व्यापार, रा. पश्‍चिम मंगळवार पेठ सोलापूर) हे सट्टा चालवत असताना आढळले. त्यांच्याकडून पोलिसांनी 17 मोबाइल ताब्यात घेतले. दोन लॅपटॉप, दोन दुचाक्‍या, एक हॉटलाईन मशिन व एक नोटबूक आणि रोख 14 हजार 100 रुपये जप्त करण्यात आले. एकूण 2 लाख 66 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

हेही वाचा: HSC EXAM : 'या' तारखेपासून अर्ज नोंदणी; जाणून घ्या सविस्तर माहिती

या संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना रविवार (ता.14) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील, सपोनि जीवन निरगुडे, दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुखे, चालक नरेंद्र नक्का यांचा सहभाग होता. या प्रकरणात फ्लॅट मालक फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top