esakal | धक्‍कादायक ! खासगी लॅबला केंद्राकडून मिळेना परवानगी 
sakal

बोलून बातमी शोधा

pathology.jpg
  • राज्यात नव्याने सुरु होणार नऊ ठिकाणी स्राव नमुने तपासणीच्या लॅब 
  • सोलापूर, धुळे, औरंगाबाद, मिरज, नागपूर, जे.जे., बी.जे. व हाफकीनचा समावेश 
  • राज्यातील खासगी आठ ठिकाणी लॅब सुरु करण्याच्या प्रस्तावावर केंद्राचे तोंडावर बोट 
  • संशयितांची ट्रॅव्हल हिस्ट्री अन्‌ कोरोनाची लक्षणे पाहूनच लॅबद्वारे स्त्राव नमुन्यांची तपासणी 

धक्‍कादायक ! खासगी लॅबला केंद्राकडून मिळेना परवानगी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात कोरोनाच्या स्राव नमुने तपासणीसाठी पुणे, मुंबई, नागपुरात तीन लॅब सुरु झाल्या असून रुग्णांची संख्या वाढल्याने आता मुंबईतील हाफकीन व जे. जे. रुग्णालयात तर पुण्यातील बी. जे. मेडीकल कॉलेजमध्येही लॅब सुरु होणार आहेत. तर सोलापूर, धुळे, औरंगाबाद, अकोला, मिरज व नागपूर येथील लॅबचा शुभारंभ शुक्रवारी (ता. 27) होणार आहे. मात्र, खासगी आठ रुग्णालयात लॅब सुरु करण्याला अद्याप केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही. 

हेही नक्‍की वाचा : अन्य जिल्ह्यांमधून सोलापुरात येणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक 


नव्या लॅबसाठी 'एनआयव्ही'कडून उपकरणे मिळणार असून केंद्र शासनाकडून कोरोना तपासणी किट्‌सही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, आयसोलेशन बेडस्‌ तयार ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांनाही आयसोलेशन बेड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहेत. एनआयव्ही संस्थेची लॅब देशातील अन्य लॅबशी जोडली असून येथील संशोधकांशी कोरोना व्हायरसबाबत चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या चाचण्या घेण्यासाठी एक प्रोटोकॉल असून संबधित संशयीतांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कोरोनाची लक्षणे असतील, तरच त्यांची चाचणी केली जात आहे. दरम्यान, ज्या व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, त्यांना घरी सोडले जात आहे. त्या व्यक्तींच्या हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का मारण्यात येत असून त्यांना 14 दिवस कोणाच्याही संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. 

हेही नक्‍की वाचा : विद्यापीठांना टाळे ! घरबसल्या शैक्षणिक आराखडा तयार करण्याचे आदेश 

27 मार्चला लॅब सुरु केल्या जातील
हाफकीन, बीजे व जेजे रुग्णालयात आज (सोमवारी) कोरोनाचे स्त्राव नमुने तपासणी लॅब सुरु होईल. मुंबईतील केईएम व कस्तुरबा रुग्णालयात लॅब सुरु केल्या आहेत. अकोला, मिरज, नागपूर, धुळे, औरंगाबाद व सोलापुरात 27 मार्चला लॅब सुरु केल्या जातील. खासगी लॅब सुरु करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. 
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई 

हेही नक्‍की वाचा : रेल्वे अन्‌ एसटी लॉक डाउन ! 31 मार्चपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद 


केंद्र सरकारचे तोंडावर बोट 
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाच्या दिशेने वाटचाल करु लागली आहे. संशयितांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी टेस्टिंग लॅब कमी पडू लागल्याने राज्य सरकारने राज्यभरात आणखी नऊ लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता स्त्राव नमुने तपासणीच्या एकूण 12 लॅब असणार आहेत. त्यात आता राज्यातील आठ खासगी रुग्णालयात लॅब सुरु करण्याला परवानगी मिळावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला काही दिवसांपूर्वी पाठविला. मात्र, त्याबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.