esakal | गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत होणाऱ्या उलाढालीवर कोरोनाचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव

गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत होणाऱ्या उलाढालीवर कोरोनाचे सावट

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंध शिथील केले असले तरी गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत होणारी उलाढाल नेहमीपेक्षा कमीच होणार असल्याची भीती व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : बिबट्याचा 'फॅन्ड्री'ला पळवण्याचा प्रयत्न

गौरी गणपती उत्सवासाठी गणेशमूर्ती व गौरीचे मुखवटे तयार करणाऱ्या मूर्तीकारांपासून महालक्ष्मीसमोर आरास करण्यासाठीच्या शोभेच्या विविध वस्तूं, इलेक्ट्रिक वस्तू, मिठाई, किराणा आदिंचे विक्रेते गणेशोत्सवाच्या सुमारे महिनाभर आधीच आर्थिक नियोजन करून भरगच्च माल आणून तयारीत असतात. परंतु गतवर्षी कोरोना महामारीने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षी देखील कोरोना निर्बधाबाबतच्या शासंकतेमुळे व्यापारी द्विधा मनस्थितीत आहेत. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही भांडवल गुंतवून त्याची विक्री न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस सामोरे जाण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी साहित्य आणताना हात आखडता घेतला आहे.

हेही वाचा: सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट !

गौरी गणपती उत्सवासाठी वर्षभर तयारी करणाऱ्या मूर्तिकारांनी दरवर्षीपेक्षा 25 टक्केच मुर्त्या यावर्षी तयार केल्या आहेत. यातही काही मूर्तीकारांनी विविध प्रकारच्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात तयार केल्या असून परगावाहूनही अनेक मुर्ती विक्रेते मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र या सर्वांची विक्री होणार का हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे.

महालक्ष्मी उत्सवात महालक्ष्मी उभारणीसाठी लोखंडी आडणी, मांडणी व छत त्याचबरोबर विविध आरास करण्यासाठीचे साहित्य आदींची रेलचेल गणेशोत्सवापूर्वी वीस दिवस आधीच बाजारपेठेत दिसत असते. यंदा मात्र या सर्वांत निरूत्साह दिसत आहे.

महालक्ष्मीच्या हळदी कुंकूवाच्या निमित्त महिला घराबाहेर पडत असतात.त्यामुळे साड्या,ड्रेसेस,सौंदर्यप्रसाधना पासून दागदागिने विकणाऱ्या सोनारांपर्यंत सर्व व्यापारी या ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात मात्र यावर्षीही हे व्यापारी शाशंक आहेत.

हेही वाचा: कर्नाटकातील मराठा समाजाची मागणी आयोगाने फेटाळली

गणेश स्थापनेनंतर तीन दिवसांनी महालक्ष्मीचे आगमन होते. महालक्ष्मीचे स्वागत महिला मोठ्या भक्तिभावाने करतात. परंपरेनुसार सायंकाळी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. दुसऱ्या दिवशी मात्र विविध गोडधोड पदार्थांबरोबर पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो यासाठी महिला स्वतः मिठाईचे विविध पदार्थ तयार करीत असतात.हल्ली तयार करण्यापेक्षा मिठाईच्या दुकानातून खरेदी केली जातात. त्यामुळे मिठाईची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी मिठाईचे दुकानदार आधी पंधरा दिवसापासून जय्यत तयारी करीत असतात परंतु यावर्षी मिठाई विक्रीबाबत कोणताच अंदाज नसल्याने तेही थांबा आणि पहा याच भुमिकेत आहेत.

हेही वाचा: फायर अलार्ममुळे टळली रेल्वे हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंध शिथिल झाले असले तरी सर्व सेवा दुपारी 4 ला बंद व गैरअत्यावश्यक सेवेसाठी असणारा शनिवार रविवारचा बंद यामध्ये उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सवलत द्यावी अशी अपेक्षा व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

"गेल्या चाळीस वर्षापासून आपण गणेशमूर्ती तयार करीत आहोत या कामात पत्नी द्रोपदी व मुलगा गोरक्षनाथ मदत करत असतात दरवर्षी मोठ्या मंडळांच्या सोडून सुमारे बाराशे ते पंधराशे मुर्त्या तयार करत असतो. यावर्षी नेहमीच्या 25 टक्केच मुर्त्या तयार केलेल्या आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद वाढला तर आणखी मुर्त्या तयार करणार आहे."

- नवनाथ कुंभार,मुर्तीकार अकलूज

loading image
go to top