
पंढरपूर: मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील वनक्षेत्रातून अवैध पद्धतीने मुरम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी दादासाहेब चव्हाण यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.