

Historic Ritual: Fadnavis Offers Mahapuja to Bhagwant for the First Time
sakal
बार्शी शहर : बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त मंगळवारी (ता. २८) दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी बार्शीच्या इतिहासात मंदिरातील सभामंडपात पहिल्यांदाच भगवंताची महापूजा केल्यामुळे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह बार्शीतील सर्वसामान्य भक्तगण आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.