आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व मैंदर्गीचे 'डॉ सुधीर सिंदगी' करणार

युनायटेड नेशन्सची विशेष नियामक एजन्सी आहे ज्यावर आंतरराष्ट्रीय शिपिंगची सुरक्षितता आणि जहाजांद्वारे होणाऱ्या सागरी आणि वातावरणातील प्रदूषण रोखण्याची जबाबदारी आहे
डॉ सुधीर सिंदगी
डॉ सुधीर सिंदगीsakal

मैंदर्गी : भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने (Directorate General of Shipping ) आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (International Maritime Organization) बैठकीमध्ये जहाज डिझाइन आणि बांधकाम (SDC) समितीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तज्ञ भारतीय प्रतिनिधींमध्ये (अधिकारी) मैंदर्गीच्या डॉ सुधीर सिंदगी यांच्या नावाची निवड करण्यात होती. ही नावे भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने, भारताचे उच्चायुक्त इंडिया हाऊस, लंडन यांच्याकडे प्रस्तावित केली होती आणि तदनंतर या नावांना भारताचे उच्चायुक्त आणि IMO या दोघांनीही मान्यता दिली. त्यानुसार चालू सत्रांमध्ये (१७ जानेवारी ते २१ जानेवारी ) मैंदर्गीच्या डॉ सुधीर सिंदगी यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.

डॉ सुधीर सिंदगी
खर्चासाठी नाहीत पैसे! एसटी संपातील कर्मचाऱ्याच्या 20 वर्षीय मुलाची आत्महत्या

IMO ही युनायटेड नेशन्सची (UN) विशेष नियामक एजन्सी आहे ज्यावर आंतरराष्ट्रीय शिपिंगची सुरक्षितता आणि जहाजांद्वारे होणाऱ्या सागरी आणि वातावरणातील प्रदूषण रोखण्याची जबाबदारी आहे. IMO चे कार्य UN शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन देते. त्यानुसार IMO च्या छत्रछायेखाली वेगवेगळ्या समिती संघटित केल्या आहेत. ह्या समितीमध्ये प्रत्येक देशाकडून ६-८ तज्ञ अधिकाऱ्यांची त्या त्या देशाकडून शिफारस केली जाते आणि त्यानुसार त्या तज्ञ अधिकाऱ्यांच्या नावाना IMO मान्यता देते. त्यानुसार ह्या समित्या वर्षभर बैठका घेऊन आंतरराष्ट्रीय नियमावली बनवत असते.

डॉ सुधीर सिंदगी
सोलापूर महापालिकेने मुदत संपलेल्या ९५ जागांचा घेतला ताबा

ह्यावर्षी भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने, जहाज डिझाइन आणि बांधकाम (SDC) समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तज्ञ भारतीय अधिकाऱ्यांमध्ये मैंदर्गीच्या डॉ सुधीर सिंदगी यांच्या नावाची निवड केली होती आणि त्यांच्या शिफारशीनुसार या नावांना भारताचे उच्चायुक्त आणि IMO या दोघांनीही मान्यता दिली. सध्या ह्या समितीची १७ जानेवारी पासून बैठक सुरु आहे आणि त्या बैठकीत मैंदर्गीच्या डॉ सुधीर सिंदगी यांना आंतरराष्ट्रीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या हि बैठक ऑनलाईन पद्धतीने होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी सारख्या छोट्याशा गावातून शिक्षण घेऊन पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाल्यामुळे जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे. ह्याआधी डॉ सुधीर सिंदगी ह्यांना भारत सरकारकडून आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्कार करण्यात आले आहेत. आयआयटी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात संस्थेमधून एमटेक आणि पीएचडी ची डिग्री घेणारे सोलापूर जिल्ह्यातून ते एकमेव व्यक्ती आहेत त्यांच्या या निवडीमुळे सर्वस्तरातून कौतुक होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com