
साखर कारखान्याच्या माध्यमातून मोहोळमधे 26 कोटी रुपयाची विज निर्मीती
सोलापुर : मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्याच्या(Sugar Factory) माध्यमातून दोन महिन्याच्या कालावधीत 26 कोटी रुपयांची पाच कोटी 47 लाख युनिट वीज निर्मिती (Electricity generation)झाली आहे. यातील काही विज कारखान्यांनी वापरली आहे तर उर्वरित वीज एक्सपोर्ट केली आहे. या वीज निर्मिती मुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला प्रति टन जादा भाव मिळण्याची आशा लागली आहे.
हेही वाचा: चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीस अटक
मोहोळ तालुक्यात भीमा, जकराया, आष्टी शुगर व लोकनेते हे चार साखर कारखाने आहेत. सध्या या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. साखर कारखाने सुरू होऊन साधारण दोन महिने झाले आहेत वरील वीज निर्मिती ही या कालावधीतील आहे. कारखानदारांचे केवळ ऊस गाळप करून त्यापासून फक्त साखर उत्पादन सुरू आहे. सारासार विचार केला व वाढत्या खर्चाचा हिशोब घातला तर फक्त साखर उत्पादन ही न परवडणारी बाब आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती असेल तर ऊस उत्पादक सभासदांना ज्यादा भाव देणे शक्य होणार आहे.
हेही वाचा: कोरोनाचा वाढता धोका! महाराष्ट्रासह पाच राज्यांची मांडवियांसोबत बैठक
सध्या लोकनेते व जकराया हे साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करतात, तर भीमा साखर कारखाना पुढच्या गळीत हंगामापासून इथेनॉल प्रकल्प सुरू करणार आहे. सध्या लोकनेते व जकराया हे कारखाने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करत आहेत. त्यामुळे इथेनॉल ला बाजारात दर ही चांगला मिळत आहे. भविष्यात उसापासून साखर उत्पादन कमी व उपपदार्थ निर्मिती ज्यादा अशी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे उपपदार्थ निर्मिती च्या माध्यमातून मिळणारा जादा महसूल शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफ आर पी च्या रकमेत मिसळुन द्यावा अशी आशा शेतकरी करीत आहेत. मुळात उपपदार्थ निर्मितीचा उद्देशच शेतकऱ्यांच्या उसाला ज्यादा दर मिळावा हा आहे.त्यामुळे किती साखर कारखाने याची अंमलबजावणी करतात हे पाहणे गरजेचे आहे.
अशी आहे कारखाना निहाय विजनिर्मीती---
लोकनेते -2 कोटी 61 लाख 45 हजार युनीट
जकराया- 1 कोटी 42 लाख युनीट
भिमा - 78 लाख युनीट
आष्टी शुगर -65 लाख युनीट
Web Title: Electricity Generation From Sugar Factory Of Rs 26 Crore In Mohol
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..