
शहर पोलिस दलात खळबळ! पोलिस आयुक्तांनी केले वरिष्ठ पोलिस निरीक्षकास निलंबित
सोलापूर : ॲट्रॉसिटीचा चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना निलंबित केले आहे. यासंदर्भात स्वत: साळुंखे यांनीही आपल्या निलंबनाचे तेच कारण असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा: भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर 'मातोश्री'जवळ शिवसैनिकांचा हल्ला
फिर्यादी श्रीकांत ज्ञानेश्वर वाघमारे हे अपंग व मागासवर्गीय असल्याची माहिती असतानाही त्यांच्याच घरात सहा महिन्यांसाठी राहायला आलेल्या तिघांनी जागा बळकावण्यासाठी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली होती. या प्रकरणात ५ एप्रिल रोजी जेलरोड पोलिसांत त्या तिघांविरूध्द ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. २००३ पासून अपंग आयुक्तालय, जिल्हा उपनिबंधक, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांकडे श्रीकांत वाघमारे यांचा पाठपुरावा सुरु होता. तत्पूर्वी, त्यांच्या वडिलांनीही त्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले होते.
अपंग आयुक्त, जिल्हा उपनिबंधकांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत श्रीकांत वाघमारे यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर जेलरोड पोलिसांनी त्या तिघांविरूध्द ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. वास्तविक पाहता मागासवर्गीयांवर अन्याय झाल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जातो. त्यासाठी विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. याठिकाणी फिर्यादीने स्वत: सांगितले की आपण तशी मागणी केली होती. त्यानुसार हकीकत पाहून आपण तो गुन्हा दाखल केल्याचे साळुंखे यांचे म्हणणे आहे. याचा तपास सुरवातीला सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांनी केला होता. दरम्यान, पोलिस कोठडीतील आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत गुरूवारी (ता. २१) सीआयडीने शहर पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक पोलिस निरीक्षक व पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शुक्रवारी पोलिस आयुक्तांनी जेलरोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाच निलंबित केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: चोरीचा मामला सेना भवनातच बोंबला, चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका
काय आहे नेमके प्रकरण...
२००० ते २००३ पासून आतापर्यंत मुस्लिम पाच्छा पेठेतील जांबवीर मागासवर्गीय को-ऑपरेटिव्ह सोसायटीची जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असून ती वारसा हक्काने श्रीकांत ज्ञानेश्वर वाघमारे (रा. मुस्लिम पाच्छा पेठ) यांना मिळाली होती. त्यावेळी कब्जातील जागेवर तुझा काय संबंध नाही, जागा विकत दे म्हणून तेथे राहायला असलेल्या तिघांनी शिवीगाळ व दमदाटी केली. दिव्यांग असल्याची माहिती असतानाही त्यांनी शारीरिक व्यंगत्वावर शिवीगाळ करून अपमान केला, अशी फिर्याद वाघमारे यांनी उस्मान हुसेनसाब बागवान, परवीन शेख, अब्दुल हमीद शेख यांच्याविरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्याविरूध्द जेलरोड पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
Web Title: Excitement In The City Police Force Senior Police Inspector Suspended By The Commissioner Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..