esakal | Solapur Crime: पतीचे बाहेरील महिलेवर प्रेम; सासरच्या त्रासातून विवाहितेची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

त्रासाला कंटाळून मुलीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पतीचे बाहेरील महिलेवर प्रेम; सासरच्या त्रासातून विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: भाजी विक्री करणाऱ्या महिलेसोबत जावयाचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्या महिलेसह जावई, मुलीची सासू, सासरे यांनी तिचा छळ केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून मुलीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद मयत स्वपना राजकुमार तडवळकर (वय 37) यांचे वडील प्रभू सिद्रामप्पा होसमणी यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली.

हेही वाचा: शरद पवारांची 'डॉक्‍टरेट' राज्यपालांच्या हाती

इंडी (जि. विजयपूर) येथील सिंदगी रोडवरील विद्या नगरात राहणारे प्रभू होसमणी यांच्या स्वप्ना व नंदिनी या दोन्ही मुलींचा विवाह 11 मे 2004 रोजी सोलापुरातील हत्तुरे वस्तीतील स्वामी विवेकानंद नगर येथील राहणाऱ्या सिध्दाराम तडवळकर यांच्या दोन्ही मुलांशी झाला. नंदिनी यांचे पती खासगी व्यवसाय करतात तर दुसरा जावई मयत स्वप्नाचा पती राजकुमार याचे ईलेक्‍ट्रिक दुकान आहे. दोन्ही मुलींचा विवाह सुखाचा सुरु होता, परंतु काही वर्षांनी राजकुमार यांच्या दुकानासमोरील भाजी मंडईत भाजी विक्रीसाठी येणाऱ्या संगिता शिवराया भाके हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर जावई राजकुमार व संगिता या दोघांनी वारंवार मुलीला शिवीगाळ करीत मारहाण व शिवीगाळ सुरु केली. त्याला सासू व सासऱ्यांनी साथ दिली.

हेही वाचा: सोलापूर: 31 वर्षांत चौथ्यांदा भरला हिप्परगा तलाव

दरम्यान, 26 सप्टेंबरला दुपारी तीनच्या सुमारास मयत स्वप्नाचे वडील बंगळुरू येथे असताना त्यांना दुसऱ्या जावयाचा कॉल आला आणि स्वपनाने गळफास घेतला असून तिला खासगी रुग्णालयात नेल्याचे सांगितले. त्यानंतर तत्काळ स्वप्नाचे वडील सोलापुरात आले. तत्पूर्वी, 25 सप्टेंबरला मयत स्वप्नाने तिच्या आईला कॉल करून पती व संगिता यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे सांगितले होते. तू घरातून निघून जा, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तिने त्यावेळी सांगितले. त्यानंतर 27 सप्टेंबरला स्वप्नाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या सर्वांच्या त्रासाला कंटाळूनच मुलगी स्वप्नाने आत्महत्या केली असून त्याला ते सर्वजण जबाबदार असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

हेही वाचा: सोलापूर: 'बुडत्याला काडीचा तसा पुरात अडकलेल्यांना दोरीचा आधार'

संशयितांना 1 ऑक्‍टोबरपर्यंत कोठडी

स्वप्ना राजकुमार तडवळकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पती राजकुमार सिध्दाराम तडवळकर, संगिता शिवराया भाके, सासू शांताबाई सिध्दाराम तडवळकर व सासरे सिध्दाराम चनबसप्पा तडवळकर (सर्वजण रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती) यांना विजापूर नाका पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 1 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगीराज गायकवाड हे करीत आहेत.

loading image
go to top