Karmala Crime : सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट; ग्रुप ॲडमिनसह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

करमाळा तालुक्यातील एका व्हाट्सअप ग्रुपवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याची तक्रार आहे.
Crime News
Crime Newsesakal

करमाळा - तालुक्यातील एका व्हाट्सअप ग्रुपवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याची तक्रार आहे. याबाबत पोस्ट करणारी व्यक्ती व ग्रुप ॲडमिन अशा दोघांवर करमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे. करमाळा तालुक्यातील 'करमाळा समाजकारण' या ग्रुप बाबात हा प्रकार घडला आहे.

या ग्रुप वर धार्मिक खेड निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्यात येत असताना ग्रुप ॲडमिनने संबंधिताला पोस्ट टाकण्यापासून थांबवले नाही. म्हणून ग्रुप ॲडमिनवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ता. 12 जुन रोजी करमाळा समाजकारण या ग्रुपवर दोन समाजामध्ये या पोस्टमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन दोन वर्गामध्ये शत्रुत्व, द्वेष भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हाट्सअपद्वारे अशी पोस्ट व्हायरल केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
शाळा व्यवस्थापन समित्यांचे छाटले पंख? विद्यार्थ्यांना सरसकट गणवेश नाही; दरवर्षी २ गणवेश, यंदा एकाचेच पैसे आले

सोशल मीडिया टाकण्यात येणाऱ्या पोस्टमुळे वाढत चाललेली सामाजिक तेढ बघता करमाळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. संबंधित ग्रुपच्या ऍडमिनने याकडे दुर्लक्ष केले. संबंधित माहिती करमाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा संबंधित ग्रुपच्या ऍडमिनने देखील ही पोस्ट डिलीट केली नाही. त्यामुळे हा कलम ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे करत आहेत.करमाळा तालुक्यातील समाज करमाळा समाजकारण या ग्रुपवर घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल होतात तालुक्यातील अनेक ग्रुप वरती ओन्ली एडमिन्स अशी सेटिंग बदलण्यात आली आहे. याप्रकरणी पोस्ट करणारी व्यक्ती श्याम परशुराम सिंधी रा. खडकपुरा, ता करमाळा, जि. सोलापूर व ग्रुप ॲडमिन नितीन आढाव पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोस्ट करणारे श्याम शिंधी यांना अटक करण्यात आली.

Crime News
Crime News: लुडो खेळता खेळता झाली मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् अश्लील व्हिडिओ केला व्हायरल

आज दि. 13 रोजी संशयित आरोपी श्याम शिंदे यांना करमाळा न्यायालय पुढे हजर केला असता, 15 जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईनंतर मात्र करमाळा तालुक्यातील सोशल मीडियात खळबळ उडाली.

करमाळा पोलिसांकडून सोशल मीडियात धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हाट्सअप, इंटाग्राम, फेसबुक यावर टाकु नये. पोलिसांचे सोशल मीडियावर लक्ष आहे. धार्मिक तेढ निर्माण कारणारी पोस्ट केल्यास त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल.

- ज्योतीराम गुंजवटे , पोलीस निरीक्षक, करमाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com