जळोलीत दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपास 

crime.jpg
crime.jpg

करकंब(सोलापूर): जळोली (ता. पंढरपूर) येथील धायगुडे वस्ती येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागन्नाथ भानुदास नरसाळे यांच्या वस्तीवर आठ व्यक्तींनी चाकुचा धाक दाखवत दरोडा टाकून एक लाख 20 हजार रूपये रोख रकमेसह तीन लाख 33 हजार पाचशे रुपयांच्या सोन्याची चोरी केली आहे. घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. 


नागनाथ नरसाळे यांनी पुतणे रविंद्र नरसाळे यांच्याकडून ऊस तोड कामगारांच्या टोळीला देण्यासाठी एक लाख 20 हजार रुपये आणून कपाटात ठेवले होते. गुरुवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा पुढे करून सर्वजण झोपले होते. त्यावेळी नागनाथ नरसाळे हे झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास नरसाळे यांना दोन अनोळखी व्यक्तींनी झोपेतून उठवून त्यांच्या हातातील चाकूचा धाक दाखवून तू ओरडलास तर तुला मारून टाकेन, असे म्हणत छातीला चाकू लावला. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती दरवाजाबाहेर उभा होता तर चार चोरटे बेडरूममध्ये होते व एका चोरट्याने नागनाथ यांच्या मुलाला धरून नागनाथकडे आणले व दोघांना किचनमध्ये नेले. 

बेडरूममध्ये असलेल्या चोरट्यांनी नागनाथ यांच्या पत्नीला व सुनेला चाकूचा धाक दाखवत 80 हजार रुपयांचे चार तोळ्याचे गंठन, 20 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे गंठन, 10 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे मणीमंगळसूत्र, सहा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे कानातील फुले, 10 हजार रुपये किमतीची अर्धा तोळा सोन्याची चैन, चार हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅम सोन्याच्या तीन अंगठ्या व एक बदाम, एक हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या मनगट्या, 20 हजार किमतीची एक तोळे सोन्याची बोरमाळ, 20 हजार किमतीची एक तोळे सोन्याचे गंठन, 20 हजार किमतीची एक तोळे सोन्याचे फुले, झुबे व वेल, अडीच हजार रुपये किमतीचे चांदीचे चार करदूडे, चार पैंजण व दोन बिंदल्या, 20 हजार रुपये किमतीचा सॅमसंग टीव्ही तसेच रोख रक्कम एक लाख 20 हजार रुपये, असा एकूण तीन लाख 33 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील करीत आहेत. 


संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com