esakal | मोठी बातमी ! महाष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन 

बोलून बातमी शोधा

pm narendra modi
  • मुंबईसाठी महाराष्ट्र राज्य परिवहनच्या 600 बस 
  • रेल्वेचे पार्सल अन्‌ लगेच बुकिंग 31 मार्चपर्यंत बंद 
  • अनारक्षित तिकीट काउंटरही बंदचा केंद्रीय रेल्वेचा निर्णय 
  • कोरोनाबाधित जिल्ह्यात जमावबंदीच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश 
मोठी बातमी ! महाष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने देशातील 75 जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसरीकडे रेल्वे व एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला, परंतु मुंबईसाठी 600 बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

हेही नक्‍की वाचा : तब्बल 650 कोटींचा फटका ! 31 मार्चपर्यंत रेल्वे अन्‌ एसटी बंद 


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने आता राज्य सरकारने कठोर पाऊल उचचले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाला त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामध्ये नगर, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, मुंबई शहर, पुणे, रायगड, ठाणे, यवतमाळ, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने रविवारी (ता. 22) ही यादी प्रसिध्द केली आहे. दुसरीकडे रेल्वेने अनारक्षित तिकीट काउंटर 31 मार्चपर्यंत बंद केली असून पार्सल व लगेच बुकिंगही थांबविली आहे. तिकीट परताव्यासाठी तीन दिवसांची मुदत आता तीन महिन्यांपर्यंत वाढविण्याचाही निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. जेणेकरुन प्रवाशांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. 

हेही नक्की वाचा : जनता कर्फ्यू ! घरगुती वीजेच्या वापरात मोठी वाढ 


सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस नियोजन 
सोलापुरात अद्यापही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नसून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलिस प्रशासनाला सक्‍त सूचना दिल्या आहेत. शहर- जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यावर बंदी घातली असून गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही बजावले आहे. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाकडून स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती करुन सातत्याने गस्त सुरु केली आहे. 


हेही नक्‍की वाचा : रेल्वे लॉक डाउन ! 31 मार्चपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही