कलिंगड्यात कमावले अन्‌ खरबुजात गमावले 

कलिंगड्यात कमावले अन्‌ खरबुजात गमावले 

बार्शी (सोलापूर) : कोरोना विषाणू महामारीचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो शेतकऱ्याला. लॉकडाउनने व्यापारी फळाचे दर पाडून मागत आहेत. शेतात किती दिवस पीक ठेवायचे म्हणून शेतकरी मिळेल तो दर घेऊन समाधान मानत आहे. पानगाव येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी मधुकर कापसे यांची अशीच व्यथा झाली असून त्यांनी कलिंगड्यात कमावले अन्‌ खरबुजात घालवले. 

सेवानिवृत्त कृषी अधिकारी 
सेवानिवृत्त कृषी अधिकारी असल्याने शेतात वेगवेगळे प्रयोग करून उत्पन्न घेण्याकडे त्यांचा कल असतो. एक एकरमध्ये शुगरक्वीन कलिंगड पीक त्यांनी घेतले. उन्हाळा व रमजान महिन्याचा अंदाज घेऊन पिकांवर फवारणी, पाणी, मजूर, डोस देऊन उच्च दर्जाचे पीक आले. सरासरी 50 हजार रुपये खर्च आला होता. कलिंगड पिकाम वांग्याचे आंतरपीक घेतले. 20 टन कलिंगड झाले अन्‌ अवघा पाच रुपये किलो दर मिळाला तरीही एक लाख रुपये मिळाले अन्‌ वांगीही चांगली बहरली आहेत.13 ते 14 किलोच्या एका कॅरेटला 220 ते 240 रुपये दर मिळत आहे. 

अहोरात्र पिकांत घेतले कष्ट 
कलिंगडा बाजूला दीड एकर प्लॉटमध्ये कुंदन खरबुजाची लागवड केली. रोपे, डोस, फवारणी ,मल्चिंग पेपर, मजुरी यासह सुमारे एक लाख 25 हजार रुपये खर्च केले. सरासरी 15 टन उत्पन्न मिळाले पण दर अवघा सात रुपये किलो मिळाला आहे. घरातील मुलगा अजिंक्‍य कापसेसह दोघेजण अहोरात्र पिकांत कष्ट घेऊन, वेळेत पाणी, फवारणी, पिकांची निगा राखून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला पण नुकसान झालेच. 

व्यापारी फळांचा दर पाडून मागत 
लॉकडाउनने बाजारपेठेतील व्यापारी फळांचा दर पाडून मागत असून ऑनलाइन पैसे देताना, वाहतुकीचे भाडे, याबाबत सुशिक्षित शेतकऱ्यांना भयंकर त्रास देताना दिसत आहेत. ठरलेल्या दराने पैसे देत नाहीत. माल ताब्यात मिळाला की पैसे किलोमागे कमी करून पाठवतात. सामान्य शेतकऱ्यांना तर जास्त फसवले जात आहे. 
- अजिंक्‍य कापसे, शेतकरी, पानगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com