
सोलापूर : मुंबई येथे २९ ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तसेच मोर्चाच्या नियोजनासाठी सध्या तालुकानिहाय बैठक सुरू आहेत. या मोर्चात जिल्ह्यातून २५ हजारहून अधिक वाहनांबरोबर दुचाकीवरूनही मुंबईला जाण्याचा निर्धार मराठा समाजबांधवांनी केला आहे. तसेच शेकडो गावागावांमध्ये चावडी वाचनाद्वारे समाजबांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.