शाळा
शाळाEsakal

कोरोनात पालकांचे मुलासह स्थलांतर! पटसंख्येअभावी ३६० शिक्षक अतिरिक्त

पूर्वीच्या ७० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दोन वर्षांपासून रखडले असतानाच आता नवीन अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर : आधार कार्डशिवाय त्या विद्यार्थ्याचा शाळेत प्रवेश ग्राह्य धरला जात नसल्याने अनेक शाळांमधील विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांची संख्या कमी झाली. या पार्श्वभूमीवर खासगी प्राथमिक शाळांमधील जवळपास १२० तर जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त होतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे.

शाळा
सरकारच्या नकाशावर मराठवाडा, विदर्भ नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुरवातीला शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. विशेषत: पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा तब्बल दोन वर्षे शाळा बंद राहिल्या. आता फेब्रुवारी २०२२ मध्ये शाळा सुरु झाल्या आहेत. तत्पूर्वी, कोरोनातील निर्बंधांमुळे हातावरील पोट असलेल्यांचे जीणे मुश्किल झाले आणि अशा परिस्थितीत पोट भरण्यासाठी अनेकांनी इतरत्र स्थलांतर केले. मुलांची शाळा बंद असल्याने त्यांनाही सोबत नेले आणि आता त्याचठिकाणी स्थायिक झाले आहेत. शिक्षकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे करूनही त्यांना मुलांचा शोध लागला नाही. तरीही, पटसंख्येचा मेळ बसविण्यासाठी त्या मुलांचे आधारकार्ड मिळविण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला, पण, त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. अनेकांनी शाळा बदलल्याचेही समजले. या पार्श्वभूमीवर आता पटसंख्या कमी झालेल्या शाळांवरील शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागणार आहे. पूर्वीच्या ७० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दोन वर्षांपासून रखडले असतानाच आता नवीन अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी शाळांमधील घटलेली पटसंख्या निश्चितच चिंताजनक असून आगामी काळात त्याची कारणे शोधून ठोस उपाय करावे लागणार आहेत.

शाळा
सदावर्तेंच्या सहकाऱ्याला नागपुरात अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

‘सरल’मुळे बनाटगिरीला बसला चाप
जिल्हा परिषदेच्या ४३ शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी झाली आहे. तर २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्याही ४० पेक्षा अधिक असून त्यात आणखी काही शाळांची भर पडणार आहे. त्यामुळे अंदाजित २०० शिक्षक अतिरिक्त होतील, पुढील आठवड्यात होणाऱ्या ऑनलाइन संच मान्यतेनंतर नेमकी संख्या बाहेर पडणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ३३० खासगी प्राथमिक शाळांपैकी ९० शाळांमधील जवळपास १०० शिक्षक अतिरिक्त होतील, असेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘सरल’ पोर्टलमुळे बनावट पटसंख्येला चाप बसला आहे.

शाळा
बाहेर देशातून कोळसा आणावा, वीज टंचाईवर दानवेंचा ठाकरे सरकारला सल्ला

शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांना अल्टिमेटम
शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार ३१ मेपूर्वी सर्व अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करावे लागणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ३३० खासगी प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे, नव्याने निर्माण होणारी पदे व अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची माहिती सोमवारपर्यंत (ता. १८) शिक्षणाधिकारी कार्यालयास कळवावी, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले आहेत. अन्यथा, त्या शाळेची पगार थांबवली जाणार आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच शिक्षकांची रिक्तपदे, रोस्टरनुसार कोणत्या प्रवर्गातील शिक्षक कमी आहेत, त्याची माहिती घेऊन आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रिया होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com